S M L

लाभासाठी गावाने सोडली जात...

28 जुलैबीड जिल्ह्यातील एका गावाने सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वेगळाच पराक्रम दाखवला आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी या गावातील लोकांनी चक्क जातच बदलून टाकली. जवळपास 2 हजार लोकसंख्या असलेल्या अंबेजोगाई तालुक्यातील सानागावात प्रामुख्याने मराठा समाजाचे प्राबल्य आहे. 2002 मध्ये झालेल्या दारिद्र्य रेषेखालील यादीत गावातील आर्थिक स्थिती उत्तम असणार्‍यांची नावे घातली गेली. यापुढे जाऊन जवळपास 67 मराठा समाजातील लोकांचा समावेश चक्क भटक्या विमुक्त जमातीत करण्यात आला. मात्र ज्यांची जात बदलली गेली त्या लोकांनाही या आपली जात बदलली गेली याची कल्पना नव्हती. सरपंचानी जात परस्पर बदलून टाकल्याची तक्रारच त्यांनी केली आहे. हीच यादी कायम ठेवत सरपंचानी अनेक सरकारी योजना गावात राबवल्या. सरकारी योजनांचा अशा प्रकारे गैरफायदा लाटण्याची तक्रार आल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी आता चौकशीचे आदेश दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 01:20 PM IST

लाभासाठी गावाने सोडली जात...

28 जुलै

बीड जिल्ह्यातील एका गावाने सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वेगळाच पराक्रम दाखवला आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी या गावातील लोकांनी चक्क जातच बदलून टाकली.

जवळपास 2 हजार लोकसंख्या असलेल्या अंबेजोगाई तालुक्यातील सानागावात प्रामुख्याने मराठा समाजाचे प्राबल्य आहे. 2002 मध्ये झालेल्या दारिद्र्य रेषेखालील यादीत गावातील आर्थिक स्थिती उत्तम असणार्‍यांची नावे घातली गेली. यापुढे जाऊन जवळपास 67 मराठा समाजातील लोकांचा समावेश चक्क भटक्या विमुक्त जमातीत करण्यात आला.

मात्र ज्यांची जात बदलली गेली त्या लोकांनाही या आपली जात बदलली गेली याची कल्पना नव्हती. सरपंचानी जात परस्पर बदलून टाकल्याची तक्रारच त्यांनी केली आहे.

हीच यादी कायम ठेवत सरपंचानी अनेक सरकारी योजना गावात राबवल्या. सरकारी योजनांचा अशा प्रकारे गैरफायदा लाटण्याची तक्रार आल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी आता चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close