S M L

रोझरी शाळेविरोधात उपोषण सुरूच

प्राची कुलकर्णी, पुणे28 जुलैपुण्यातील रोझरी शाळेने केलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. शाळेने केलेली फी वाढ अंशत: मागे घ्यावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काल म्हणजेच मंगळवारी दिलेत. पण रोझरी शाळेचे व्यवस्थापन मात्र याबाबत पालकांना हमी द्यायला तयार नाही. त्यामुळेच पालकांनी उपोषण आंदोलन सुरुच ठेवले आहे.पालकांनी दाखल केलेल्या तक्रारी नंतर शिक्षण उपसंचालकांनी शाळेला ही फी वाढ प्रत्येक शाळेला अंशत: मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. शाळेच्या शाखांमधील फी पुढीलप्रमाणे...वारजे - 450 रुपये विमान नगर - 516 रुपयेकॅम्प - 473 रुपयेबिबवेवाडी - 174 रुपयेसाळुंखे विहार - 527 रुपयेजास्त फी मागे घेण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. मंगळवारपासून रोझरीच्या सर्व पाच शाखांच्या पालक संघटनेतर्फे राज्याच्या शिक्षण संचालक कार्यालयासमोरच उपोषण सुरु झाले आहे. शाळेने चालवलेल्या लुटीविरोधात पालक संघटीत झाले आहेत.आता 30 जुलैला पालक, शाळा प्रशासन आणि शिक्षण संचालकांसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. पण एवढे दिवस मुजोरी करणारे शाळेचे व्यवस्थापन सरकारच्या आदेशाला जुमानणार का? हाच पालकांचा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 03:31 PM IST

रोझरी शाळेविरोधात उपोषण सुरूच

प्राची कुलकर्णी, पुणे

28 जुलै

पुण्यातील रोझरी शाळेने केलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.

शाळेने केलेली फी वाढ अंशत: मागे घ्यावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काल म्हणजेच मंगळवारी दिलेत. पण रोझरी शाळेचे व्यवस्थापन मात्र याबाबत पालकांना हमी द्यायला तयार नाही. त्यामुळेच पालकांनी उपोषण आंदोलन सुरुच ठेवले आहे.

पालकांनी दाखल केलेल्या तक्रारी नंतर शिक्षण उपसंचालकांनी शाळेला ही फी वाढ प्रत्येक शाळेला अंशत: मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.

शाळेच्या शाखांमधील फी पुढीलप्रमाणे...

वारजे - 450 रुपये

विमान नगर - 516 रुपये

कॅम्प - 473 रुपये

बिबवेवाडी - 174 रुपये

साळुंखे विहार - 527 रुपये

जास्त फी मागे घेण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत.

मंगळवारपासून रोझरीच्या सर्व पाच शाखांच्या पालक संघटनेतर्फे राज्याच्या शिक्षण संचालक कार्यालयासमोरच उपोषण सुरु झाले आहे. शाळेने चालवलेल्या लुटीविरोधात पालक संघटीत झाले आहेत.

आता 30 जुलैला पालक, शाळा प्रशासन आणि शिक्षण संचालकांसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. पण एवढे दिवस मुजोरी करणारे शाळेचे व्यवस्थापन सरकारच्या आदेशाला जुमानणार का? हाच पालकांचा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close