S M L

हरी मशीद गोळीबार प्रकरण सीबीआयकडे

30 जुलैसुप्रीम कोर्टाने हरी मशीद गोळीबार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सहा महिन्याच्या आत हा तपास पूर्ण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीदरम्यान वडाळ्यातील हरी मशीदमध्ये नमाज सुरू असताना पोलिसांनी गोळीबार केला होता. यात 6 जण ठार झाले होते. पोलीस अधिकारी निखील कापसे यांच्या आदेशावरुन हा गोळीबार करण्यात आला होता. श्रीकृष्ण आयोगाने या प्रकरणात निखील कापसे यांच्यावर ठपका ठेवला होता. मात्र राज्य सरकारने कापसे यांना क्लीन चिट दिली होती.हायकोर्टाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. त्यानंतर राज्य सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2010 09:15 AM IST

हरी मशीद गोळीबार प्रकरण सीबीआयकडे

30 जुलै

सुप्रीम कोर्टाने हरी मशीद गोळीबार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सहा महिन्याच्या आत हा तपास पूर्ण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

1993 मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीदरम्यान वडाळ्यातील हरी मशीदमध्ये नमाज सुरू असताना पोलिसांनी गोळीबार केला होता. यात 6 जण ठार झाले होते.

पोलीस अधिकारी निखील कापसे यांच्या आदेशावरुन हा गोळीबार करण्यात आला होता. श्रीकृष्ण आयोगाने या प्रकरणात निखील कापसे यांच्यावर ठपका ठेवला होता. मात्र राज्य सरकारने कापसे यांना क्लीन चिट दिली होती.

हायकोर्टाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. त्यानंतर राज्य सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2010 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close