S M L

मुंबईतील मलेरियाचा आढावा

30 जुलैमुंबईत दिवसेंदिवस मलेरियाचा प्रभाव वाढतो आहे. महापालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी काय उपाय योजना केल्यात आणि त्या किती यशस्वी झाल्या, याचा आढावा आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतला. महापौर श्रद्धा जाधव आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासोबत त्यांनी यासाठी आढावा बैठक घेतली. त्यात मलेरियाची साथ आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शिवसेना वस्त्यांमध्ये आरोग्य शिबीरे भरवणार आहे. खासगी डॉक्टरांच्या मदतीने ही शिबीरे चालवली जातील. सरकारी हॉस्पिटल्सना खासगी डॉक्टर्स आणि खासगी हॉस्पिटल्स मलेरियाच्या निर्मूलनात मदत करतील, असे निर्णय घेण्यात आले. तसेच डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण ओळखून त्यानुसार धूरफवारणी केली जाईल, असेही यावेळी ठरवण्यात आले.सरकारचा महापालिकेवर ठपकामलेरियाबाबत राज्यसरकारने महापालिकेवर ठपका ठेवला आहे. तीन वर्षांपासून मुंबई, ठाणे आणि नाशिक या महापालिका क्षेत्रांमध्ये मलेरियाचे प्रमाण वाढत आहे. याबाबत खबरदारी घ्या, असे सहा महिन्यांपूर्वीच पत्र पाठवून सांगण्यात आले आहे. पण महापालिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी म्हटले आहे.नवी मुंबईतील मलेरिया आटोक्यातविनय म्हात्रे, नवी मुंबईमुंबईत सध्या मलेरियाने थैमान घातले असले तरी, मुंबईलाच लागून असलेल्या नवी मुंबईतील मलेरियाच्या पेशंटमध्ये यावर्षी विलक्षण घट झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे हा वाषिर्क निर्देशांक दोनपेक्षा कमी आला आहे.नवी मुंबई शहर वसताना तिथे कोणी घर घ्यायला तयार होत नव्हते. कारण होते फक्त तेथील मलेरियाचा प्रादुर्भाव. सुरुवातीला मलेरियाचा वाषिर्क जंतू निर्देशांक 30 टक्के होता. आता हेच प्रमाण 1.39 टक्के झाले आहे. महानगरपालिकेने त्यासाठी एक आराखडा बनवला. त्यानुसार एक लाख घरांची पाहणी करून त्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. यात खरे यश मिळाले ते जनजागृतीमुळे. मलेरियाबाबत घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पथनाट्य स्पर्धांचाही यासाठी चांगला फायदा झाला. नवी मुंबई महापालिकेने 32 हजार ठिकाणची डास उत्पत्ती नष्ट केली. डासांनी अंडी घातल्यानंतर 15 दिवसांच्या आत डास तयार होण्यापूर्वीच या डासांच्या अळी नष्ट केल्या गेल्या. यामुळेच नवी मुंबईत मलेरियाचे प्रमाण कमी करणे शक्य झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2010 12:26 PM IST

मुंबईतील मलेरियाचा आढावा

30 जुलै

मुंबईत दिवसेंदिवस मलेरियाचा प्रभाव वाढतो आहे. महापालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी काय उपाय योजना केल्यात आणि त्या किती यशस्वी झाल्या, याचा आढावा आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतला.

महापौर श्रद्धा जाधव आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासोबत त्यांनी यासाठी आढावा बैठक घेतली. त्यात मलेरियाची साथ आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शिवसेना वस्त्यांमध्ये आरोग्य शिबीरे भरवणार आहे.

खासगी डॉक्टरांच्या मदतीने ही शिबीरे चालवली जातील. सरकारी हॉस्पिटल्सना खासगी डॉक्टर्स आणि खासगी हॉस्पिटल्स मलेरियाच्या निर्मूलनात मदत करतील, असे निर्णय घेण्यात आले. तसेच डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण ओळखून त्यानुसार धूरफवारणी केली जाईल, असेही यावेळी ठरवण्यात आले.

सरकारचा महापालिकेवर ठपका

मलेरियाबाबत राज्यसरकारने महापालिकेवर ठपका ठेवला आहे. तीन वर्षांपासून मुंबई, ठाणे आणि नाशिक या महापालिका क्षेत्रांमध्ये मलेरियाचे प्रमाण वाढत आहे. याबाबत खबरदारी घ्या, असे सहा महिन्यांपूर्वीच पत्र पाठवून सांगण्यात आले आहे. पण महापालिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी म्हटले आहे.

नवी मुंबईतील मलेरिया आटोक्यात

विनय म्हात्रे, नवी मुंबई

मुंबईत सध्या मलेरियाने थैमान घातले असले तरी, मुंबईलाच लागून असलेल्या नवी मुंबईतील मलेरियाच्या पेशंटमध्ये यावर्षी विलक्षण घट झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या उपाययोजनांमुळे हा वाषिर्क निर्देशांक दोनपेक्षा कमी आला आहे.

नवी मुंबई शहर वसताना तिथे कोणी घर घ्यायला तयार होत नव्हते. कारण होते फक्त तेथील मलेरियाचा प्रादुर्भाव. सुरुवातीला मलेरियाचा वाषिर्क जंतू निर्देशांक 30 टक्के होता. आता हेच प्रमाण 1.39 टक्के झाले आहे.

महानगरपालिकेने त्यासाठी एक आराखडा बनवला. त्यानुसार एक लाख घरांची पाहणी करून त्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. यात खरे यश मिळाले ते जनजागृतीमुळे. मलेरियाबाबत घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पथनाट्य स्पर्धांचाही यासाठी चांगला फायदा झाला.

नवी मुंबई महापालिकेने 32 हजार ठिकाणची डास उत्पत्ती नष्ट केली. डासांनी अंडी घातल्यानंतर 15 दिवसांच्या आत डास तयार होण्यापूर्वीच या डासांच्या अळी नष्ट केल्या गेल्या.

यामुळेच नवी मुंबईत मलेरियाचे प्रमाण कमी करणे शक्य झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2010 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close