S M L

मनसेचे खड्डे छायाचित्र प्रदर्शन

4 ऑगस्टमुंबईतील खड्डे, घाणीचे साम्राज्य, त्यामुळे पसरलेले मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लूसारखे साथीचे रोग... अशी सध्या मुंबईची अवस्था आहे. या दुरवस्थेत असलेल्या मुंबईच्या छायाचित्रांचे प्रदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. दादर पश्चिमेकडील डी. एल. वैद्य मार्गावरील विठ्ठल मंदिरात 'मुंबई देशा (दशा)' या नावाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. मुंबईतील विविध प्रकल्प, योजनांबाबत पालिकेतर्फे गाजावाजा केला जात असतानाच खरी परिस्थिती मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहता येईल. यात मुंबईच्या काही भागाचे हवाई चित्रणही करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.उद्धव ठाकरेंची टीकादरम्यान मनसेच्या प्रदर्शनावर आज उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. याला महाराष्ट्र देशा म्हणायचे की महाराष्ट्र द्वेषा म्हणायचे, असा टोला त्यांनी राज यांना लगावला आहे.तसेच आता मनसेला फक्त शिवसेना द्वेषा म्हणायचे बाकी राहिले आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2010 02:35 PM IST

मनसेचे खड्डे छायाचित्र प्रदर्शन

4 ऑगस्ट

मुंबईतील खड्डे, घाणीचे साम्राज्य, त्यामुळे पसरलेले मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लूसारखे साथीचे रोग... अशी सध्या मुंबईची अवस्था आहे.

या दुरवस्थेत असलेल्या मुंबईच्या छायाचित्रांचे प्रदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आले आहे. दादर पश्चिमेकडील डी. एल. वैद्य मार्गावरील विठ्ठल मंदिरात 'मुंबई देशा (दशा)' या नावाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

मुंबईतील विविध प्रकल्प, योजनांबाबत पालिकेतर्फे गाजावाजा केला जात असतानाच खरी परिस्थिती मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहता येईल. यात मुंबईच्या काही भागाचे हवाई चित्रणही करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.

उद्धव ठाकरेंची टीका

दरम्यान मनसेच्या प्रदर्शनावर आज उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. याला महाराष्ट्र देशा म्हणायचे की महाराष्ट्र द्वेषा म्हणायचे, असा टोला त्यांनी राज यांना लगावला आहे.

तसेच आता मनसेला फक्त शिवसेना द्वेषा म्हणायचे बाकी राहिले आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2010 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close