S M L

दुसर्‍या जागतिक साहित्य महोत्सवाकडे सरकारचं दुर्लक्ष

24 ऑक्टोबर, मुंबई - सध्या महाराष्ट्रात अमेरिकेत होणार्‍या संमेलनाचे हाकारे घातले जात आहेत. मुख्यमंत्रीही त्याचं स्वागत करत आहेत, पण मुंबईत सध्या सुरू असलेल्या दुसर्‍या जागतिक साहित्य महोत्सवाकडे मात्र माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने जवळपास पाठ फिरवली आहे. सरकारी उपेक्षेमुळं या महोत्सवाचे संचालक नामदेव ढसाळ यांना अनेकांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. नामदेव ढसाळ गेल्या वर्षीपासून बर्लिन फेस्टिव्हलच्या धर्तीवर मुंबईत जागतिक साहित्य महोत्सव भरवत आहेत. 'विलासराव देशमुखांनी थोडी फार रक्कम द्यायची ती दिली. आम्हाला या महोत्सवासाठी जवळपास साठेक लेखक आणायचे होते. पण अपु-या निधीमुळे 40 लेखक आम्हाला बाहेरच ठेवावे लागले. त्यादृष्टीने मदत झाली नाही,' असं कवी नामदेव ढसाळ म्हणाले.या बाहेर ठेवाव्या लागलेल्या लेखकांत नोबेल पारितोषिक विजेते व्ही. एस. नायपॉल आणि ग्रुंथर ग्रास यांचाही समावेश आहे. ' या दुसर्‍या महोत्सवाच्या उद्घाटनाला ऐनवेळी सहकार मंत्री पतंगराव कदम आले खरे, पण त्यांना ढसाळांचं भाषण ऐकायलाही वेळ नव्हता.त्यांना स्वत:ला भाषण करायचं होतं. ते त्यांनी केलंच आणि तेही ढसाळांच्या हातातून माईक घेऊन. 'माननीय मुख्यमंत्र्यांनी जी काही आर्थिक मदत द्यायची होती ती दिलेली आहे. ती किती दिली आहे याची निश्चित कल्पना मला नाही. पण नामदेव ढसाळ यांनी सांगितलं तसं त्यांना मदत झालेली आहे. आम्ही त्यांना मदत करायचं ठरवलेलं आहे. सर्व मदत होईल.पण एक धाडसी उपक्रम नामदेव ढसाळ याही परिस्थितीत करत आहेत. या सर्व उपक्रमाला माझ्या शुभेच्छा!' असं सहकार मंत्री पतंगराव कदम म्हणाले. सरकारकडून अपेक्षापूर्तीऐवजी केवळ शुभेच्छाच मिळाल्या असल्या तरी ढसाळांनी आपली जिद्द सोडलेली नाही. त्यांची धडपड चालूच आहे. 'मुळात सत्तेच्या राजकारणात गुंतलेल्यांचं कला-साहित्याविषयक प्रेम बेगडी आहे असं मी म्हणणार नाही, पण त्यांची बरीचशी व्यवधानं असतात आणि त्यात साहित्य-कलांना फारसं महत्त्व अलिकडच्या काळात दिलं जात नाही. त्यामुळे अशा महोत्सवाला अडचणी येतात, ' असं कवी नामदेव ढसाळ म्हणाले. या महोत्सवासात नॉर्वे, स्वीडनसह अन्य सात देशांतून मान्यवर साहित्यिक सहभागी झाले आहेत. हा महोत्सव मुंबईत रवीन्द्र नाट्यमंदिर इथे 26 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यात मराठीसह भारतीय लेखकही सहभागी होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2008 08:07 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2008 08:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close