S M L

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातल्या गुन्हेगारांची ओळख पटली

10 ऑगस्टपुण्यात जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती आली आहे. स्फोटातील गुन्हेगारांची ओळख पटली असून लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळेल अशी माहिती गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिली. या आरोपींचे पत्तेही पोलिसांना मिळाले आहेत, असंही आर.आर.पाटील यांनी सांगितले आहे. पण हे सर्व आरोपी फरार झाले असून ते देशाच्या वेगवेगळ्या भागात गेले असण्याची शक्यता आहे. पुण्यात 13 फेब्रुवारीला कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात 11 जणांचा बळी गेला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2010 12:59 PM IST

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातल्या गुन्हेगारांची ओळख पटली

10 ऑगस्ट

पुण्यात जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती आली आहे. स्फोटातील गुन्हेगारांची ओळख पटली असून लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळेल अशी माहिती गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिली. या आरोपींचे पत्तेही पोलिसांना मिळाले आहेत, असंही आर.आर.पाटील यांनी सांगितले आहे. पण हे सर्व आरोपी फरार झाले असून ते देशाच्या वेगवेगळ्या भागात गेले असण्याची शक्यता आहे. पुण्यात 13 फेब्रुवारीला कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात 11 जणांचा बळी गेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2010 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close