S M L

अजिंठा- वेरुळ आणि शिर्डीसाठी हेलिकॉप्टर सेवा

11 ऑगस्टजगप्रसिध्द अंजिठा- वेरूळ लेणी आणि शिर्डी देवस्थानासाठी लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी प्राथमिक बैठक झाली आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवताच, डेक्कन एअरवेजची हेलिकॅप्टर सेवा सुरू होणार आहे.त्यामुळे जगभरातून आणि देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या पर्यटकांना कमीत कमी वेळेत अजिंठा- वेरूळ आणि शिर्डीला जाता येईल. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक भेट देतात. औंरंगाबादहून अजिंठा लेणीपर्यंत जायला आणि परतीला पाच तास लागतात. हेलिकॉप्टर सेवा सुरू झाल्यास एकाच दिवसात अजिंठा आणि वेरूळ लेण्या पाहता येतील. अजिंठा - वेरूळ सोबतच अनेक पर्यटक शिर्डीला जाऊ इच्छितात त्यामुळं या योजनेत शिर्डीचाही समावेश करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 11, 2010 04:47 PM IST

अजिंठा- वेरुळ आणि शिर्डीसाठी हेलिकॉप्टर सेवा

11 ऑगस्ट

जगप्रसिध्द अंजिठा- वेरूळ लेणी आणि शिर्डी देवस्थानासाठी लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी प्राथमिक बैठक झाली आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवताच, डेक्कन एअरवेजची हेलिकॅप्टर सेवा सुरू होणार आहे.

त्यामुळे जगभरातून आणि देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या पर्यटकांना कमीत कमी वेळेत अजिंठा- वेरूळ आणि शिर्डीला जाता येईल. अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक भेट देतात. औंरंगाबादहून अजिंठा लेणीपर्यंत जायला आणि परतीला पाच तास लागतात. हेलिकॉप्टर सेवा सुरू झाल्यास एकाच दिवसात अजिंठा आणि वेरूळ लेण्या पाहता येतील. अजिंठा - वेरूळ सोबतच अनेक पर्यटक शिर्डीला जाऊ इच्छितात त्यामुळं या योजनेत शिर्डीचाही समावेश करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 11, 2010 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close