S M L

'मुंबई वन' बिल्डिंगला सेनेचा विरोध

19 ऑगस्टदेशातील सगळ्यात मोठी रहिवासी बिल्डिंग मुंबईत लोअर परेल इथं उभी राहणार आहे. पण आता या 107 मजली बिल्डिंगला शिवसेनेनं विरोध केलाय. नव्याने बनवण्यात येणार्‍या विकास आरा़खड्यापूर्वी वाढीव एफएसआय आणि टॉवरना परवानगी देऊ नये अशी मागणी मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहूल शेवाळेंनी केली आहे. लोढासारख्या ग्रुपला मुंबईत 107 मजली टॉवर उभारण्याची परवानी दिल्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या पायभूत सुविधांवर ताण पडणार असल्याचा दावा शेवाळेंनी केलाय. टोलेजंग इमारतीमुळे मुंबईतल्या मुलभूत सेवा सुविधांवर ताण पडत असल्यामुळे नविन विकास आराखडा जोपर्यतं तयार होत नाही तोपर्यंत याला परवानगी देऊ नये अशी त्यांनी मागणी केली आहे. हा विकास आराख़डा 2012 पर्यंत तयार होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2010 01:58 PM IST

'मुंबई वन' बिल्डिंगला सेनेचा विरोध

19 ऑगस्ट

देशातील सगळ्यात मोठी रहिवासी बिल्डिंग मुंबईत लोअर परेल इथं उभी राहणार आहे. पण आता या 107 मजली बिल्डिंगला शिवसेनेनं विरोध केलाय. नव्याने बनवण्यात येणार्‍या विकास आरा़खड्यापूर्वी वाढीव एफएसआय आणि टॉवरना परवानगी देऊ नये अशी मागणी मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहूल शेवाळेंनी केली आहे. लोढासारख्या ग्रुपला मुंबईत 107 मजली टॉवर उभारण्याची परवानी दिल्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या पायभूत सुविधांवर ताण पडणार असल्याचा दावा शेवाळेंनी केलाय. टोलेजंग इमारतीमुळे मुंबईतल्या मुलभूत सेवा सुविधांवर ताण पडत असल्यामुळे नविन विकास आराखडा जोपर्यतं तयार होत नाही तोपर्यंत याला परवानगी देऊ नये अशी त्यांनी मागणी केली आहे. हा विकास आराख़डा 2012 पर्यंत तयार होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2010 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close