S M L

न्यूक्लिअर लायबिलिटी विधेयक आज लोकसभेत मांडणार

25 ऑगस्टन्यूक्लिअर लायबिलिटी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. भाजप आणि इतर विरोधी पक्षांच्या आक्षेपानंतर विधेयकांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. पण या बदलानंतर विरोधीपक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार का, तसंच भाजप आज कुठली भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.न्युक्लिअर लायबिलिटी विधेयकाचा मार्ग आता सोपा झाला आहे. पण त्यासाठी सरकारला पुन्हा एकदा विरोधकांसमोर झुकावं लागलं आहे. भारत- अमेरिका अणुकरारांतर्गत भारतात जेव्हा अणुभट्‌ट्या उभारल्या जातील. तेव्हा कोणताही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याविषयी हे विधेयक आहे. परदेशी पुरवठाकारांची जबाबदारी निश्चित करणार्‍या कलम 17 Bमधल्या 'हेतू' या शब्दाला भाजपाने आक्षेप घेतला होता. काही वेळापूर्वीच भाजपच्या आक्षेपाची दखल घेत हा शब्द विधेयकातून काढून टाकायची सरकारने तयारी दाखवली. त्यानंतर भाजपने या विधेयकाला पाठिंबा दिला. त्यामुळे विधेयकाच्या बाजूने पुरेसे संख्याबळ असले तरीही डावे समाजवादी पक्ष आणि राजद यांचा विरोध मात्र कायम आहे. या विधेयकावर लोकसभेत आज चर्चा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2010 10:16 AM IST

न्यूक्लिअर लायबिलिटी विधेयक आज लोकसभेत मांडणार

25 ऑगस्ट

न्यूक्लिअर लायबिलिटी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार आहे. भाजप आणि इतर विरोधी पक्षांच्या आक्षेपानंतर विधेयकांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. पण या बदलानंतर विरोधीपक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार का, तसंच भाजप आज कुठली भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

न्युक्लिअर लायबिलिटी विधेयकाचा मार्ग आता सोपा झाला आहे. पण त्यासाठी सरकारला पुन्हा एकदा विरोधकांसमोर झुकावं लागलं आहे. भारत- अमेरिका अणुकरारांतर्गत भारतात जेव्हा अणुभट्‌ट्या उभारल्या जातील. तेव्हा कोणताही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याविषयी हे विधेयक आहे. परदेशी पुरवठाकारांची जबाबदारी निश्चित करणार्‍या कलम 17 Bमधल्या 'हेतू' या शब्दाला भाजपाने आक्षेप घेतला होता. काही वेळापूर्वीच भाजपच्या आक्षेपाची दखल घेत हा शब्द विधेयकातून काढून टाकायची सरकारने तयारी दाखवली. त्यानंतर भाजपने या विधेयकाला पाठिंबा दिला. त्यामुळे विधेयकाच्या बाजूने पुरेसे संख्याबळ असले तरीही डावे समाजवादी पक्ष आणि राजद यांचा विरोध मात्र कायम आहे. या विधेयकावर लोकसभेत आज चर्चा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close