S M L

नाशिक महानगरपालिकेच्या सभेत गोंधळ

25 ऑगस्टमनमानीचा कहर करत नाशिक महानगरपालिकेत कोट्यावधी रुपयांच्या विनानिविदा कामांना महापौर नयना घोलप यांनी मंजुरी दिली. सातपूरचं नियमबाह्य क्षेत्रबदल, जकात ठेकेदाराची दादागिरी, बडगुजर कंपनीला विनानिविदा कोट्यवधींची मंजुरी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा अपेक्षित होती. प्रशासनानं केलेल्या बेकायदेशीर पदोन्नतीची लक्षवेधी खुद्द शिवसेनेच्या नगरसेवकानंच उपस्थित केली होती. तरी या सार्‍याला बगल देत महापौर नयना घोलप यांनी जबरदस्तीनं विषय मंजूर करून राष्ट्रगीत सुरू केलं. त्यामुळे चर्चेला वाव न मिळालेल्या विरोधकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केलं. शिवसेनेसह मनसे आणि राष्ट्रवादीनं निषेधाचे फलक फडकवले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 25, 2010 11:16 AM IST

नाशिक महानगरपालिकेच्या सभेत गोंधळ

25 ऑगस्ट

मनमानीचा कहर करत नाशिक महानगरपालिकेत कोट्यावधी रुपयांच्या विनानिविदा कामांना महापौर नयना घोलप यांनी मंजुरी दिली. सातपूरचं नियमबाह्य क्षेत्रबदल, जकात ठेकेदाराची दादागिरी, बडगुजर कंपनीला विनानिविदा कोट्यवधींची मंजुरी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा अपेक्षित होती. प्रशासनानं केलेल्या बेकायदेशीर पदोन्नतीची लक्षवेधी खुद्द शिवसेनेच्या नगरसेवकानंच उपस्थित केली होती. तरी या सार्‍याला बगल देत महापौर नयना घोलप यांनी जबरदस्तीनं विषय मंजूर करून राष्ट्रगीत सुरू केलं. त्यामुळे चर्चेला वाव न मिळालेल्या विरोधकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केलं. शिवसेनेसह मनसे आणि राष्ट्रवादीनं निषेधाचे फलक फडकवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 25, 2010 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close