S M L

दिल्लीत शेतकर्‍यांनी केला मायावतींचा विरोध

26 ऑगस्टउत्तरप्रदेशात मायावतींनी आणलेल्या यमुना एक्सप्रेसवे प्रकल्पाच्या विरोधात तिथल्या शेतकर्‍यांनी दिल्लीत येऊन निदर्शनं केली. या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांची जी जमीन संपादित केली गेली. त्यासाठी त्यांना आणखीन अधिक भरपाई हवी आहे. अलिगढ, मेरठ, आणि बुलंदशहर भागातून हजारो शेतकरी दिल्लीत रामलीला मैदानावरुन एकत्र जमले होते. त्याठिकाणी त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मायावतींचा निषेध केला. शेतकर्‍यांच्या रॅलीला राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग, भाजपचे काही नेते, आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं. पण या निदर्शनाचा परिणाम दिल्लीतल्या वाहतूक व्यवस्थेवर दिसून आला. त्यामुळं ऐन संध्याकाळच्या वेळी दिल्लीतल्या प्रमुख रस्त्यांवरचं ट्रॅफिक जाम झालं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 26, 2010 04:25 PM IST

दिल्लीत शेतकर्‍यांनी केला मायावतींचा विरोध

26 ऑगस्ट

उत्तरप्रदेशात मायावतींनी आणलेल्या यमुना एक्सप्रेसवे प्रकल्पाच्या विरोधात तिथल्या शेतकर्‍यांनी दिल्लीत येऊन निदर्शनं केली. या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांची जी जमीन संपादित केली गेली. त्यासाठी त्यांना आणखीन अधिक भरपाई हवी आहे. अलिगढ, मेरठ, आणि बुलंदशहर भागातून हजारो शेतकरी दिल्लीत रामलीला मैदानावरुन एकत्र जमले होते. त्याठिकाणी त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मायावतींचा निषेध केला. शेतकर्‍यांच्या रॅलीला राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग, भाजपचे काही नेते, आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं. पण या निदर्शनाचा परिणाम दिल्लीतल्या वाहतूक व्यवस्थेवर दिसून आला. त्यामुळं ऐन संध्याकाळच्या वेळी दिल्लीतल्या प्रमुख रस्त्यांवरचं ट्रॅफिक जाम झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2010 04:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close