S M L

बिगर सभासदांनाही योग्य ऊस भाव देण्याचे आदेश

28 ऑगस्टसाखर कारखान्यांनी सभासद शेतकर्‍यांप्रमाणेच बिगर सभासद शेतकर्‍यांना उसाचा भाव द्यावा आणि त्यांची 1994 पासूनची फरकाची थकबाकी द्यावी, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे बिगर सभासद शेतकर्‍यांची पिळवणूक करणार्‍या सहकारी साखर कारखानदारांना यापुढे सर्वांना समान मोबदला द्यावा लागणार आहे.नळेगाव येथील जय जवान जय किसान या सहकारी साखर कारखान्याला अंबाजोगाई तालुक्यातील देवळा व अंजनपूर या तालुक्यातील शेतकर्‍यांनी 1994 मध्ये ऊस दिला होता. त्यावेळी या कारखान्याने सभासद शेतकर्‍यांना प्रतिटन 665 रूपये भाव दिला.पण देवळा व अंजनपूर येथील शेतकरी जय जवान जय किसानचे सभासद नसल्याने त्यांना पहिल्या टप्प्यात 460 आणि दुसर्‍या टप्प्यात 160 रूपये दिले. त्यांना सभासद शेतकर्‍यांपेक्षा 55 रूपये कमी भाव दिल्याने या शेतकर्‍यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर कोर्टाने या सर्व शेतकर्‍यांना त्यांच्या फरकाची 1994 पासूनची थकबाकी द्यावी असा आदेश तर दिलाच, पण साखर कारखान्यांनी सभासद व बिगर सभासद असा भेदभाव करू नये, असेही या निकालात म्हटले.त्यामुळे या निकालाच्या आधारे इतर शेतकरीही थकबाकीसाठी पात्र ठरतातच, शिवाय यापुढील काळात हा आदेश राज्यातील सर्वच कारखान्यांना लागू होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना समान भाव मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 28, 2010 11:50 AM IST

बिगर सभासदांनाही योग्य ऊस भाव देण्याचे आदेश

28 ऑगस्ट

साखर कारखान्यांनी सभासद शेतकर्‍यांप्रमाणेच बिगर सभासद शेतकर्‍यांना उसाचा भाव द्यावा आणि त्यांची 1994 पासूनची फरकाची थकबाकी द्यावी, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे बिगर सभासद शेतकर्‍यांची पिळवणूक करणार्‍या सहकारी साखर कारखानदारांना यापुढे सर्वांना समान मोबदला द्यावा लागणार आहे.

नळेगाव येथील जय जवान जय किसान या सहकारी साखर कारखान्याला अंबाजोगाई तालुक्यातील देवळा व अंजनपूर या तालुक्यातील शेतकर्‍यांनी 1994 मध्ये ऊस दिला होता. त्यावेळी या कारखान्याने सभासद शेतकर्‍यांना प्रतिटन 665 रूपये भाव दिला.

पण देवळा व अंजनपूर येथील शेतकरी जय जवान जय किसानचे सभासद नसल्याने त्यांना पहिल्या टप्प्यात 460 आणि दुसर्‍या टप्प्यात 160 रूपये दिले. त्यांना सभासद शेतकर्‍यांपेक्षा 55 रूपये कमी भाव दिल्याने या शेतकर्‍यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

त्यांच्या अर्जावर कोर्टाने या सर्व शेतकर्‍यांना त्यांच्या फरकाची 1994 पासूनची थकबाकी द्यावी असा आदेश तर दिलाच, पण साखर कारखान्यांनी सभासद व बिगर सभासद असा भेदभाव करू नये, असेही या निकालात म्हटले.

त्यामुळे या निकालाच्या आधारे इतर शेतकरीही थकबाकीसाठी पात्र ठरतातच, शिवाय यापुढील काळात हा आदेश राज्यातील सर्वच कारखान्यांना लागू होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना समान भाव मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 28, 2010 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close