S M L

जळगावात दोन दरोडे

30 ऑगस्टजळगावात दोन ठिकाणी दरोडे पडले आहेत. शिवराम नगर भागातील संपन्न अपार्टमेंटमध्ये भल्या पहाटे दरोडा पडला. सात दरोडेखोरांनी या भागात राहणार्‍या मेहता कुटुंबाला तलवारीचा धाक दाखवून दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लुटला. त्यानंतर हे दरोडेखोर कारमधून पसार झाले. तर शिवकॉलनी इथे राहणार्‍या शंकर भागवानी यांच्या घरावरही एका टोळीने तलवारीने धाक दाखवून अशाच पद्धतीने दरोडा टाकला. या दोन्ही ठिकाणी एकाच टोळीने दरोडा टाकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस अधिक्षक चंद्रकांत कुंभार यांनी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन तपासाचे आदेश दिले. नेमक्या किती रकमेचे सोने आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण जवळपास 5 लाखांच्या आसपास ही रक्कम असावी, असा अंदाज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 30, 2010 01:24 PM IST

जळगावात दोन दरोडे

30 ऑगस्ट

जळगावात दोन ठिकाणी दरोडे पडले आहेत. शिवराम नगर भागातील संपन्न अपार्टमेंटमध्ये भल्या पहाटे दरोडा पडला. सात दरोडेखोरांनी या भागात राहणार्‍या मेहता कुटुंबाला तलवारीचा धाक दाखवून दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लुटला.

त्यानंतर हे दरोडेखोर कारमधून पसार झाले. तर शिवकॉलनी इथे राहणार्‍या शंकर भागवानी यांच्या घरावरही एका टोळीने तलवारीने धाक दाखवून अशाच पद्धतीने दरोडा टाकला.

या दोन्ही ठिकाणी एकाच टोळीने दरोडा टाकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस अधिक्षक चंद्रकांत कुंभार यांनी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन तपासाचे आदेश दिले.

नेमक्या किती रकमेचे सोने आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटली, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण जवळपास 5 लाखांच्या आसपास ही रक्कम असावी, असा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2010 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close