S M L

राज्यात सर्वत्र मुसळधार

31 ऑगस्टगेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे.नागपुरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शहरातील नरेंद्र नगर पुलाखालून पाणी जात असल्यानं अनेक तास वाहतूक ठप्प झाली होती. महापालिकेने आता झोन निहाय पथके नेमली आहेत. तसेच 10 बोटीसुद्धा आता सज्ज करण्यात आल्या आहेत. गडचिरोलीत 143 गावांचा संपर्क तुटलागडचिरोलीतही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती नदीला पूर आल्याने 143 गावांचा संपर्क तुटला आहे. लभान तांडा नाल्यात पाणी भरल्याने आलापल्ली भागातील रस्ते बंद झाले आहेत. अनेक घरात पाणी शिरले आहे.भामरागड मधील नदीच्या पुराचा फटका अनेक आदिवासींना बसला आहे. दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचे मोठे नुकसाने झाले आहे.मराठवाड्यातील धरणे भरलीमुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. 8 धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी वगळता औरंगाबादमधील सगळी धरणे भरली आहेत. सध्या येलदरी धरणाचे 10, सिध्देश्वरचे 14, विष्णुपुरी धरणाचे 4, इसापूर प्रल्पाचे 11, मांजराचे 2, तेरणा प्रकल्पाचा 1, सिना कोळेगाव धरणाचे 4 दरवाजे उघण्यात आलेत. यामुळे नद्यांना पूर आल्याने धरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये दोघांचा तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. 'राधानगरी'चे 7 दरवाजे उघडलेकोल्हापूर परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे 7 दरवाजे उघडले गेले आहेत. आतापर्यंत 10 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत कॅचमेंट परिसरात 77 मिमी पाऊस पडला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 10:23 AM IST

राज्यात सर्वत्र मुसळधार

31 ऑगस्ट

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे.

नागपुरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शहरातील नरेंद्र नगर पुलाखालून पाणी जात असल्यानं अनेक तास वाहतूक ठप्प झाली होती. महापालिकेने आता झोन निहाय पथके नेमली आहेत. तसेच 10 बोटीसुद्धा आता सज्ज करण्यात आल्या आहेत.

गडचिरोलीत 143 गावांचा संपर्क तुटला

गडचिरोलीतही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती नदीला पूर आल्याने 143 गावांचा संपर्क तुटला आहे. लभान तांडा नाल्यात पाणी भरल्याने आलापल्ली भागातील रस्ते बंद झाले आहेत. अनेक घरात पाणी शिरले आहे.

भामरागड मधील नदीच्या पुराचा फटका अनेक आदिवासींना बसला आहे. दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचे मोठे नुकसाने झाले आहे.

मराठवाड्यातील धरणे भरली

मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. 8 धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी वगळता औरंगाबादमधील सगळी धरणे भरली आहेत.

सध्या येलदरी धरणाचे 10, सिध्देश्वरचे 14, विष्णुपुरी धरणाचे 4, इसापूर प्रल्पाचे 11, मांजराचे 2, तेरणा प्रकल्पाचा 1, सिना कोळेगाव धरणाचे 4 दरवाजे उघण्यात आलेत.

यामुळे नद्यांना पूर आल्याने धरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये दोघांचा तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

'राधानगरी'चे 7 दरवाजे उघडले

कोल्हापूर परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे 7 दरवाजे उघडले गेले आहेत. आतापर्यंत 10 हजार 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे.

सकाळी 8 वाजेपर्यंत कॅचमेंट परिसरात 77 मिमी पाऊस पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close