S M L

एका हिंदकेसरीची व्यथा

31 ऑगस्टज्यांनी कुस्तीसाठी आपले अख्खे आयुष्य वाहिले असे भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे. आता ते 76 वर्षाचे आहेत. त्यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला नावलौकीक मिळवून दिला. पण आता आयुष्य उतरणीला लागल्यावर महाराष्ट्र सरकारलाच त्यांचा विसर पडला आहे. सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या तुटपुंज्या पेन्शनमुळे आणि मिळणार्‍या वागणुकीमुळे हिंदकेसरी खंचनाळे व्यथित झाले आहेत. 3 मे 1959ला श्रीपती खंचनाळेनी पहिल्या वहिल्या हिंदकेसरीवर नाव कोरले. पंजाबच्या कुस्तीगिराला हरवत खंचनाळे रातोरात हिरो झाले... पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनीही खंचानळे यांना घरी बोलावून त्यांचा सत्कार केला होता...पण आता म्हातारपणी मात्र खंचनाळे यांना अनेक रोगांनी ग्रासले आहे. त्यांच्या मणक्यावर चार आणि गुडघ्याची एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यासाठी त्यांचे दहा लाखांहून अधिक पैसे खर्च झाले आहेत. पण त्यांची व्यथा एकच आहे. उतारवयात सरकारकडून त्यांना कुठलीच मदत मिळत नाही.त्यांनी कोट्यातून फ्लॅट मिळावा यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. पण अजूनही त्याला यश आलेले नाही. त्यामुळे आपण केलेल्या कष्टाचे फळ हेच का, असा प्रश्न ते सरकारला आणि लोकप्रतिनीधींना विचारत आहेत. उदरनिर्वाहासाठी धड पेन्शन नाही, सरकारकडून कोणती आर्थिक मदत नाही, मुलांना नोकरीमध्ये संधी नाही अशा परिस्थितीत जगायचे कसे, हा प्रश्न श्रीपती खंचनाळे यांना सतावत आहे. हा प्रश्न फक्त खंचनाळे यांचा नाही, तर स्वर्गीय हिंदकेसरी मारुती माने यांच्या वाट्यालाही अशाच प्रकारचे आयुष्य आले. त्यामुळे आता तरी सरकार जागे होणार का, असा प्रश्न मल्ल तसेच कुस्ती प्रेमी विचारत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2010 03:51 PM IST

एका हिंदकेसरीची व्यथा

31 ऑगस्ट

ज्यांनी कुस्तीसाठी आपले अख्खे आयुष्य वाहिले असे भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे. आता ते 76 वर्षाचे आहेत. त्यांनी आपल्या कामगिरीने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला नावलौकीक मिळवून दिला.

पण आता आयुष्य उतरणीला लागल्यावर महाराष्ट्र सरकारलाच त्यांचा विसर पडला आहे. सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या तुटपुंज्या पेन्शनमुळे आणि मिळणार्‍या वागणुकीमुळे हिंदकेसरी खंचनाळे व्यथित झाले आहेत.

3 मे 1959ला श्रीपती खंचनाळेनी पहिल्या वहिल्या हिंदकेसरीवर नाव कोरले. पंजाबच्या कुस्तीगिराला हरवत खंचनाळे रातोरात हिरो झाले... पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनीही खंचानळे यांना घरी बोलावून त्यांचा सत्कार केला होता...

पण आता म्हातारपणी मात्र खंचनाळे यांना अनेक रोगांनी ग्रासले आहे. त्यांच्या मणक्यावर चार आणि गुडघ्याची एक शस्त्रक्रिया झाली आहे.

त्यासाठी त्यांचे दहा लाखांहून अधिक पैसे खर्च झाले आहेत. पण त्यांची व्यथा एकच आहे. उतारवयात सरकारकडून त्यांना कुठलीच मदत मिळत नाही.

त्यांनी कोट्यातून फ्लॅट मिळावा यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. पण अजूनही त्याला यश आलेले नाही. त्यामुळे आपण केलेल्या कष्टाचे फळ हेच का, असा प्रश्न ते सरकारला आणि लोकप्रतिनीधींना विचारत आहेत.

उदरनिर्वाहासाठी धड पेन्शन नाही, सरकारकडून कोणती आर्थिक मदत नाही, मुलांना नोकरीमध्ये संधी नाही अशा परिस्थितीत जगायचे कसे, हा प्रश्न श्रीपती खंचनाळे यांना सतावत आहे.

हा प्रश्न फक्त खंचनाळे यांचा नाही, तर स्वर्गीय हिंदकेसरी मारुती माने यांच्या वाट्यालाही अशाच प्रकारचे आयुष्य आले. त्यामुळे आता तरी सरकार जागे होणार का, असा प्रश्न मल्ल तसेच कुस्ती प्रेमी विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2010 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close