S M L

वाशीममध्ये मुली बेपत्ता होणे सुरूच

3 सप्टेंबर वाशीम जिल्ह्यातील मुली आणि महिला बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम आहे. शेलू बाजार परिसरातून मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे आहे. जवळपास वर्षभरापूर्वी एकाच कुटुंबातील 3 मुली गायब झाल्या. त्यांचा शोध अजून लागलेला नाही. महिन्याभरापूर्वीही 2 विवाहित महिला आणि मुले बेपत्ता झाली. त्यांना शोधण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही. पोलीस स्टेशनजवळच्या परिसरातून 2 मुलींना पळवून नेऊन अहमदाबाद इथे मॅरेज ब्युरोत विकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यातील एका मुलीने स्वतःची सुटका करून घेतली होती. तिने दिलेल्या माहितीनंतर मुली पळवून नेण्याच्या या घटना उघड झाल्या होत्या. लग्नाचे आमिष दाखवून या मुलींना विकले जात असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. महिला आणि मुलींना पळवून नेण्यामागे मध्यप्रदेशातील एका टोळीचा हात असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. तर, लहान मुलींनाही पळवून नेले जात असल्याने मानवी अवयव तस्करीसाठी हा प्रकार होत असण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 11:34 AM IST

वाशीममध्ये मुली बेपत्ता होणे सुरूच

3 सप्टेंबर

वाशीम जिल्ह्यातील मुली आणि महिला बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम आहे. शेलू बाजार परिसरातून मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे आहे. जवळपास वर्षभरापूर्वी एकाच कुटुंबातील 3 मुली गायब झाल्या.

त्यांचा शोध अजून लागलेला नाही. महिन्याभरापूर्वीही 2 विवाहित महिला आणि मुले बेपत्ता झाली. त्यांना शोधण्यात पोलिसांना अजून यश आलेले नाही.

पोलीस स्टेशनजवळच्या परिसरातून 2 मुलींना पळवून नेऊन अहमदाबाद इथे मॅरेज ब्युरोत विकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यातील एका मुलीने स्वतःची सुटका करून घेतली होती. तिने दिलेल्या माहितीनंतर मुली पळवून नेण्याच्या या घटना उघड झाल्या होत्या.

लग्नाचे आमिष दाखवून या मुलींना विकले जात असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. महिला आणि मुलींना पळवून नेण्यामागे मध्यप्रदेशातील एका टोळीचा हात असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

तर, लहान मुलींनाही पळवून नेले जात असल्याने मानवी अवयव तस्करीसाठी हा प्रकार होत असण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close