S M L

सोनिया चौथ्यांदा काँग्रेस अध्यक्ष

3 सप्टेंबरसोनिया गांधी चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या आहेत. या निवडीची औपचारिक घोषणा ऑस्कर फर्नांडिस यांनी आज दिल्लीत केली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची काल शेवटची तारीख होती. यावेळी सोनियांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे कालच त्यांची निवड पक्की झाली होती. सोनिया गांधींनी 1998 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेस दोन वेळा सत्तेत आली. काँग्रेसच्या 125 वर्षांच्या काळात सर्वात जास्त काळ अध्यक्षपदावर राहण्याचा मान सोनिया गांधींना मिळाला आहे. सोनियांच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर एक नजर टाकूया...इटलीतील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेली सोनिया.. पुढे जाऊन जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीतली सर्वांत लोकप्रिय नेता होईल, असे क्वचितच कुणाला वाटले असेल.सोनियांची काँग्रेस पक्षातली सुरवातीची पावले काहीशी अनिच्छेची आणि डळमळीत होती. 2004 साली भाजपच्या लेखी त्या एक अपरिपक्व नेत्या होत्या.पण शायनिंग इंडियात रमलेल्या भाजपला कल्पना नव्हती की याच नवख्या सोनिया लिहून दिलेली भाषणे वाचत शाइन होत नसलेला इंडिया पिंजून काढत होत्या. सुरवातीला त्यांच्यात फारसा आत्मविश्वास दिसत नव्हता. पण त्या प्रामाणिक प्रयत्न करत राहिल्या. त्यांनी नवे मित्र बनवले. पूर्वीचे शत्रू जवळ केले. आणि ज्या समाजाची मते मिळत नव्हती, त्या समाजावर प्रभाव असलेले मित्रपक्ष विचारपूर्वक बनवले. निवडणुकीत देशाने काँग्रेसला पसंती दिली. काँग्रेसने सोनियांना पसंती दिली. पण सोनियांनी आपली पसंती त्या माणसाला दिली.. जो होता सगळ्यांत विश्वासू.सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाचा त्याग केला. त्यांच्या या त्यागाच्या कहाणीचे थेट प्रक्षेपण देशातील घराघरांत झाले. सत्तेचा त्याग करून सोनिया अधिकच शक्तिशाली झाल्या. हा मास्टरस्ट्रोक मारणार्‍या सोनियांनीच 1999मध्ये माझ्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, असे म्हणून घोडचूक केली होतीअशा चुका त्यांनी पुन्हा कधीही केल्या नाहीत. सोनियांनी आणि त्यांच्या सरकारने अनेक अडथळे यशस्वीपणे पार केले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक असो की लाभाच्या पदाचा वाद, भारत अमेरिका अणुकरारानंतर झालेले विश्वासमत असो.शक्तिशाली सोनिया आणि प्रामाणिक पंतप्रधान यांनी अधिका-यांच्या विभागणीचे नवे सूत्र यशस्वीपणे सांभाळले ते म्हणजे.. सोनिया पक्षाक डे लक्ष देतील.. आणि मनमोहन सिंग सरकारकडे..विरोधकांनी सोनियांवर.. रिमोट कंट्रोल चालवत असल्याचे आरोप केले.. पण कालांतराने ते मागे पडले.देशातील सर्वांत जुना पक्ष.. ज्यांनी नव्याने उभारला.. सत्तेत आणला.. त्या काँग्रेसकडे आजही सोनिया गांधींना पर्याय नाही. सोनिया गांधी या दोन शब्दांच्या जादूवरच आजही या पक्षाची भिस्त आहे. सोनियांचा करिष्मा1997 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल 1998 मध्ये पहिल्यांदा पक्षाध्यक्ष बनल्या1998 आणि 2005 मध्ये बिनविरोध निवड काँग्रेसमध्ये सर्वाधिक काळ अध्यक्षपदावर 1999 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली आघाडी करून काँग्रेसला सत्ता मिळवून दिली 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत यूपीएला यश मिळवून दिले

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2010 12:45 PM IST

सोनिया चौथ्यांदा काँग्रेस अध्यक्ष

3 सप्टेंबर

सोनिया गांधी चौथ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या आहेत. या निवडीची औपचारिक घोषणा ऑस्कर फर्नांडिस यांनी आज दिल्लीत केली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची काल शेवटची तारीख होती. यावेळी सोनियांच्या विरोधात एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे कालच त्यांची निवड पक्की झाली होती.

सोनिया गांधींनी 1998 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेस दोन वेळा सत्तेत आली. काँग्रेसच्या 125 वर्षांच्या काळात सर्वात जास्त काळ अध्यक्षपदावर राहण्याचा मान सोनिया गांधींना मिळाला आहे.

सोनियांच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर एक नजर टाकूया...

इटलीतील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेली सोनिया.. पुढे जाऊन जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीतली सर्वांत लोकप्रिय नेता होईल, असे क्वचितच कुणाला वाटले असेल.

सोनियांची काँग्रेस पक्षातली सुरवातीची पावले काहीशी अनिच्छेची आणि डळमळीत होती. 2004 साली भाजपच्या लेखी त्या एक अपरिपक्व नेत्या होत्या.पण शायनिंग इंडियात रमलेल्या भाजपला कल्पना नव्हती की याच नवख्या सोनिया लिहून दिलेली भाषणे वाचत शाइन होत नसलेला इंडिया पिंजून काढत होत्या.

सुरवातीला त्यांच्यात फारसा आत्मविश्वास दिसत नव्हता. पण त्या प्रामाणिक प्रयत्न करत राहिल्या. त्यांनी नवे मित्र बनवले. पूर्वीचे शत्रू जवळ केले. आणि ज्या समाजाची मते मिळत नव्हती, त्या समाजावर प्रभाव असलेले मित्रपक्ष विचारपूर्वक बनवले. निवडणुकीत देशाने काँग्रेसला पसंती दिली. काँग्रेसने सोनियांना पसंती दिली. पण सोनियांनी आपली पसंती त्या माणसाला दिली.. जो होता सगळ्यांत विश्वासू.

सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाचा त्याग केला. त्यांच्या या त्यागाच्या कहाणीचे थेट प्रक्षेपण देशातील घराघरांत झाले. सत्तेचा त्याग करून सोनिया अधिकच शक्तिशाली झाल्या. हा मास्टरस्ट्रोक मारणार्‍या सोनियांनीच 1999मध्ये माझ्याकडे पुरेसे संख्याबळ आहे, असे म्हणून घोडचूक केली होतीअशा चुका त्यांनी पुन्हा कधीही केल्या नाहीत.

सोनियांनी आणि त्यांच्या सरकारने अनेक अडथळे यशस्वीपणे पार केले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक असो की लाभाच्या पदाचा वाद, भारत अमेरिका अणुकरारानंतर झालेले विश्वासमत असो.शक्तिशाली सोनिया आणि प्रामाणिक पंतप्रधान यांनी अधिका-यांच्या विभागणीचे नवे सूत्र यशस्वीपणे सांभाळले ते म्हणजे.. सोनिया पक्षाक डे लक्ष देतील.. आणि मनमोहन सिंग सरकारकडे..

विरोधकांनी सोनियांवर.. रिमोट कंट्रोल चालवत असल्याचे आरोप केले.. पण कालांतराने ते मागे पडले.देशातील सर्वांत जुना पक्ष.. ज्यांनी नव्याने उभारला.. सत्तेत आणला.. त्या काँग्रेसकडे आजही सोनिया गांधींना पर्याय नाही. सोनिया गांधी या दोन शब्दांच्या जादूवरच आजही या पक्षाची भिस्त आहे.

सोनियांचा करिष्मा

1997 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल

1998 मध्ये पहिल्यांदा पक्षाध्यक्ष बनल्या

1998 आणि 2005 मध्ये बिनविरोध निवड

काँग्रेसमध्ये सर्वाधिक काळ अध्यक्षपदावर

1999 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली

आघाडी करून काँग्रेसला सत्ता मिळवून दिली

2004 आणि 2009 च्या निवडणुकीत यूपीएला यश मिळवून दिले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2010 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close