S M L

तरी दुरावा नाही...

4 सप्टेंबरलवासा प्रकरणी जरी चौकशीचे आदेश दिले असले तरीही सत्ताधार्‍यांमध्ये दरी निर्माण होणार नाही, असा दावा महसूल मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.काल चौकशीचे आदेश देणार्‍या राणेंनी आज जरा सामंजस्याची भूमिका घेतली आहे. लवासा प्रकल्पात काही जमिनी आदिवासींकडून बळजबरीने घेतल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे मी महसूल मंत्री म्हणून चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठीचा असेल तर त्याचे स्वागतच आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे विदर्भात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राणे नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारपरिषद घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2010 10:01 AM IST

तरी दुरावा नाही...

4 सप्टेंबर

लवासा प्रकरणी जरी चौकशीचे आदेश दिले असले तरीही सत्ताधार्‍यांमध्ये दरी निर्माण होणार नाही, असा दावा महसूल मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

काल चौकशीचे आदेश देणार्‍या राणेंनी आज जरा सामंजस्याची भूमिका घेतली आहे.

लवासा प्रकल्पात काही जमिनी आदिवासींकडून बळजबरीने घेतल्याच्या अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यामुळे मी महसूल मंत्री म्हणून चौकशीचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठीचा असेल तर त्याचे स्वागतच आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे.

अतिवृष्टीमुळे विदर्भात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राणे नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारपरिषद घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2010 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close