S M L

राहुल गांधी महाराष्ट्र दौर्‍यावर

7 सप्टेंबरकाँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत.दौर्‍याची सुरुवात त्यांनी अकोल्याहून केली आहे. अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 410 विद्यार्थ्यांशी राहुल गांधींनी संवाद साधला. यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी एकूण 15 प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. या वेळी महात्मा गांधींच्या गावाकडे चला या नार्‍याचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. यावेळी मीडियाला मात्र दूरच ठेवण्यात आले. तर विमानतळ ते कृषीविद्यापीठ परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांशी संवादऔरंगाबादमध्येही राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पण राहुल यांच्या या दौर्‍याच्या सुरक्षेचा फटका विद्यार्थ्यांना बसला. अकोल्यात विद्यार्थ्यांना बूट घालण्याची सक्ती पोलीसांनी केली. तर औरंगाबादमध्ये मुलींना दागिने काढण्यास सांगण्यात आले. तर मुलांचे बेल्टही पोलिसांनी काढून घेतले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 09:50 AM IST

राहुल गांधी महाराष्ट्र दौर्‍यावर

7 सप्टेंबर

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत.

दौर्‍याची सुरुवात त्यांनी अकोल्याहून केली आहे. अकोल्यात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 410 विद्यार्थ्यांशी राहुल गांधींनी संवाद साधला. यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांनी एकूण 15 प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. या वेळी महात्मा गांधींच्या गावाकडे चला या नार्‍याचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

यावेळी मीडियाला मात्र दूरच ठेवण्यात आले. तर विमानतळ ते कृषीविद्यापीठ परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती.

औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

औरंगाबादमध्येही राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पण राहुल यांच्या या दौर्‍याच्या सुरक्षेचा फटका विद्यार्थ्यांना बसला. अकोल्यात विद्यार्थ्यांना बूट घालण्याची सक्ती पोलीसांनी केली.

तर औरंगाबादमध्ये मुलींना दागिने काढण्यास सांगण्यात आले. तर मुलांचे बेल्टही पोलिसांनी काढून घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close