S M L

शिरकुर्मासाठी बाजारपेठा सज्ज

शेखलाल शेख, औरंगाबाद7 सप्टेंबरमहिनाभर रोजे केल्यानंतर मुस्लिम बांधव, ईद-उल-फित्रची नमाज झाली की, नातेवाईक आणि मित्रमंडळींची गळा भेट घेऊन त्यांना ' शिरकुर्मा ' देतात... गरीब असो की श्रीमंत सगळ्या मुस्लिम बांधवांच्या घरी शिरकुर्मा असतोच.... शिरकुर्मा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुकामेवा लागतो... त्यामुळे सध्या बाजारपेठेत देश-परदेशातल्या सुकामेव्यांची रेलचेल आहे... या वर्षी बदाम , पिस्ता परदेशातून आयात करण्यात आलेत. पण सर्वत्र महागाई वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुकामेव्याचे भाव 10 टक्क्यांनी वधारले आहेत. महागाई जरी वाढली असली, तरी खरेदी करणार्‍यांच्या उत्साहात कोणत्याही प्रकारची कमतरता आलेली नाही. इतर महिन्यांच्या तुलनेत रमजान महिन्यात सुका मेव्याची जास्त विक्री होते, असल्याचे दुकानदार सांगतात. सुका मेव्याचे विविध पदार्थ 50 ते हजार रुपये किलोने मिळत आहेत. 20 व्या रोजापासून सुका मेव्याची विक्री वाढली आहे.शिवाय शिरखुर्मासाठी शेवया महत्वाच्या असतात. यासाठी अहमदाबाद, हैद्राबाद इथल्या शेवयांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 03:02 PM IST

शिरकुर्मासाठी बाजारपेठा सज्ज

शेखलाल शेख, औरंगाबाद

7 सप्टेंबर

महिनाभर रोजे केल्यानंतर मुस्लिम बांधव, ईद-उल-फित्रची नमाज झाली की, नातेवाईक आणि मित्रमंडळींची गळा भेट घेऊन त्यांना ' शिरकुर्मा ' देतात...

गरीब असो की श्रीमंत सगळ्या मुस्लिम बांधवांच्या घरी शिरकुर्मा असतोच....

शिरकुर्मा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुकामेवा लागतो... त्यामुळे सध्या बाजारपेठेत देश-परदेशातल्या सुकामेव्यांची रेलचेल आहे...

या वर्षी बदाम , पिस्ता परदेशातून आयात करण्यात आलेत. पण सर्वत्र महागाई वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुकामेव्याचे भाव 10 टक्क्यांनी वधारले आहेत.

महागाई जरी वाढली असली, तरी खरेदी करणार्‍यांच्या उत्साहात कोणत्याही प्रकारची कमतरता आलेली नाही. इतर महिन्यांच्या तुलनेत रमजान महिन्यात सुका मेव्याची जास्त विक्री होते, असल्याचे दुकानदार सांगतात. सुका मेव्याचे विविध पदार्थ 50 ते हजार रुपये किलोने मिळत आहेत.

20 व्या रोजापासून सुका मेव्याची विक्री वाढली आहे.शिवाय शिरखुर्मासाठी शेवया महत्वाच्या असतात. यासाठी अहमदाबाद, हैद्राबाद इथल्या शेवयांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close