S M L

इकोफ्रेंडली गणेशाला मागणी

उदय जाधव, मुंबई7 सप्टेंबरपर्यावरणाच्या संवर्धनासाठी सध्या सगळीकडे इकोफ्रेंडली गणेश मूतीर्ंची संख्या वाढत आहे. त्यातच आता गिरगावच्या कुडाळ देशकर मंडळाने फायबरची कायमस्वरुपी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.गणेशोत्सवाच्या देखाव्यांतून अनेक विषयांबरोबरच पर्यावरण जनजागृतीही आवर्जून केली जाते. पण खुद्द गणपती बाप्पाच प्लॅस्टरपासून बनवले जात असल्याने गणेशोत्सवातील पर्यावरणाचा धोका वाढला आहे. हे टाळण्यासाठीच कुडाळकर मंडळाने फायबरपासून गणपती तयार केला आहे.गणपती बाप्पांच्या सजावटीतूनही पर्यावरणाचाच संदेश दिला गेला आहे. या मंडळाने शाडू किंवा कागदाच्या लगद्यापासून गणपती बनवणे टाळले आहे.हा गणपती विसर्जित न करता वर्षभर ठेवला जाणार आहे. दर मंगळवारी आणि संकष्टीला त्याची पूजा-अर्चा केली जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवातीला भक्तिभाव वर्षभर राहील, अशी या मंडळाची श्रद्धा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2010 04:01 PM IST

इकोफ्रेंडली गणेशाला मागणी

उदय जाधव, मुंबई

7 सप्टेंबर

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सध्या सगळीकडे इकोफ्रेंडली गणेश मूतीर्ंची संख्या वाढत आहे. त्यातच आता गिरगावच्या कुडाळ देशकर मंडळाने फायबरची कायमस्वरुपी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवाच्या देखाव्यांतून अनेक विषयांबरोबरच पर्यावरण जनजागृतीही आवर्जून केली जाते. पण खुद्द गणपती बाप्पाच प्लॅस्टरपासून बनवले जात असल्याने गणेशोत्सवातील पर्यावरणाचा धोका वाढला आहे. हे टाळण्यासाठीच कुडाळकर मंडळाने फायबरपासून गणपती तयार केला आहे.

गणपती बाप्पांच्या सजावटीतूनही पर्यावरणाचाच संदेश दिला गेला आहे. या मंडळाने शाडू किंवा कागदाच्या लगद्यापासून गणपती बनवणे टाळले आहे.

हा गणपती विसर्जित न करता वर्षभर ठेवला जाणार आहे. दर मंगळवारी आणि संकष्टीला त्याची पूजा-अर्चा केली जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवातीला भक्तिभाव वर्षभर राहील, अशी या मंडळाची श्रद्धा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2010 04:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close