S M L

जर्मन बेकरी स्फोट तपास पूर्ण

8 सप्टेंबरजर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एटीएसने आज दोन जणांना अटक केली आहे. हिमायात बेग आणि बिलाल अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. हिमायत बेग हा या स्फोटांचा मास्टर माईंड असल्याचे एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उदगीरमध्ये स्फोटांचा कट रचण्यात आला. त्यासाठीच्या बैठकीत मोहसीन चौधरी, हिमायत बेग आणि बिलाल हे उपस्थित होते. तेथील ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्ये हा बाँब बनविण्यात आला. हिमायत बेगने 31 जानेवारीला जर्मन बेकरीची पाहणी केली होती. 3 फेब्रुवारीला त्यांच्यात पुन्हा एकदा बैठक झाली. हिमायत बेगला पुण्यातील महात्मा गांधी बस स्टॉपवरुन अटक करण्यात आली. बेग हा 2006 मध्ये औरंगाबादमध्ये पकडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातही सहभागी होता. बेग हा लष्कर-ए-तोयबाचा महाराष्ट्र प्रमुख आहे. तो इंडियन मुजाहिद्दीनच्या मोड्युलमध्ये काम करत होता. तर त्याचा साथीदार बिलालने पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. 2008मध्ये तो पाकिस्तानमध्ये गेला होता. आणि त्यानंतर तो बांगलादेशमधून भारतात परतला. बिलालला नाशिकच्या सातपूरमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन किलो आरडीक्स आणि बाँब बनविण्याचे साहित्य, मोबाईल फोन्स, पेन ड्राईव्ह आणि अमेरिकन डॉलर्स मिळाले आहेत. त्यांचा साथीदार बिलाल हा पुण्यात शिकत होता... बिलाल हा फर्स्ट इयर बीएसी नापास आहे. नाशिकमध्येही बाँबस्फोट घडविण्याचा त्यांचा उद्देश होता. मोहसीन चौधरी आणि यासीन भटकळ उर्फ शाहरुख हे दोघे फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2010 10:45 AM IST

जर्मन बेकरी स्फोट तपास पूर्ण

8 सप्टेंबर

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एटीएसने आज दोन जणांना अटक केली आहे. हिमायात बेग आणि बिलाल अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.

हिमायत बेग हा या स्फोटांचा मास्टर माईंड असल्याचे एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उदगीरमध्ये स्फोटांचा कट रचण्यात आला. त्यासाठीच्या बैठकीत मोहसीन चौधरी, हिमायत बेग आणि बिलाल हे उपस्थित होते. तेथील ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्ये हा बाँब बनविण्यात आला. हिमायत बेगने 31 जानेवारीला जर्मन बेकरीची पाहणी केली होती.

3 फेब्रुवारीला त्यांच्यात पुन्हा एकदा बैठक झाली. हिमायत बेगला पुण्यातील महात्मा गांधी बस स्टॉपवरुन अटक करण्यात आली. बेग हा 2006 मध्ये औरंगाबादमध्ये पकडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातही सहभागी होता.

बेग हा लष्कर-ए-तोयबाचा महाराष्ट्र प्रमुख आहे. तो इंडियन मुजाहिद्दीनच्या मोड्युलमध्ये काम करत होता. तर त्याचा साथीदार बिलालने पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. 2008मध्ये तो पाकिस्तानमध्ये गेला होता. आणि त्यानंतर तो बांगलादेशमधून भारतात परतला.

बिलालला नाशिकच्या सातपूरमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन किलो आरडीक्स आणि बाँब बनविण्याचे साहित्य, मोबाईल फोन्स, पेन ड्राईव्ह आणि अमेरिकन डॉलर्स मिळाले आहेत.

त्यांचा साथीदार बिलाल हा पुण्यात शिकत होता... बिलाल हा फर्स्ट इयर बीएसी नापास आहे. नाशिकमध्येही बाँबस्फोट घडविण्याचा त्यांचा उद्देश होता. मोहसीन चौधरी आणि यासीन भटकळ उर्फ शाहरुख हे दोघे फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2010 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close