S M L

वक्फ भूखंड महाघोटाळा उघड

प्राची जतानिया, संजय वरकड9 सप्टेंबरगरजू मुस्लिमांच्या कल्याणासाठी राखून ठेवलेल्या वक्फ बोर्डाच्या देशभरातील लाखो एकर जमिनी वादात सापडल्या आहेत.मोक्याच्या जागी असणार्‍या या जमिनी कवडीमोल भावाने विकण्यात येत असल्याचें उघड झाले आहे. या जमिनींची किंमत 1 लाख 20 हजार कोटी रुपये आहे. अल्पसंख्याक आयोगाने या भ्रष्टाचाराचा देशभरातील तपशील तयार केला आहे. यातून राजकारणी, धार्मिक नेते आणि बिल्डर्स यांचे लागेबांधेही उघड झाले आहेत.औरंगाबाद आणि मुंबईतील जमिनी लाटल्याऔरंगाबादमधील निरालाबाजार या मध्यवर्ती भागातील वक्फ बोर्डाच्या ताब्यातील 14 एकर जागा निर्माण भारती डेव्हलपर्सला केवळ 8 कोटी रुपयांत विकण्यात आली. या जमिनीचा बाजारभाव आहे, तब्बल 60 कोटींपेक्षा जास्त. या करारावर सह्या झाल्या त्यावेळी काँग्रेसचे आमदार आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे भाऊ दिलीप देशमुख हेही निर्माण भारतीच्या संचालक मंडळात होते.आता हे प्रकरण हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे. याप्रकरणी दिलीप देशमुखांनी बोलण्यास नकार दिला. आपण केवळ 18 दिवसच संबंधित कंपनीचे संचालक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात 23 हजार मालमत्तामहाराष्ट्र वक्फ बोर्डाकडे वक्फच्या 23 हजार मालमत्ता आहेत. तर 92 हजार एकर जमीन आहे.सरकारच्या सर्व्हे रिपोर्टनुसार यातल्या 60 टक्के जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. शहरातील 300 कोटींचे सिटी सेंटर मॉलही पूर्वीच्या हाजी झकारिया अहमद पटेल मोमॅडियन अनाथाश्रम ट्रस्टच्या अनाथश्रमाच्या जागेवर उभा आहे.आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, मुंबई सेंट्रलमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अनाथाश्रमची 3 एकर जमीन त्याच्या ट्रस्टींनी केवळ 1 कोटी रुपयांना विकली. सप्टेंबर 2004 मध्ये ती नील कमल रिऍल्टर्स आणि बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडला विकण्यात आली. याचा बाजारभाव आहे तब्बल 100 कोटी. 100 कोटींचा हा भूखंड केवळ 1 कोटीला विकण्यात आला.भाडेकरारांतही गैरव्यवहार केवळ विक्रीतच नाही तर वक्फच्या जमिनी भाडेतत्वावर देतानासुद्धा कमालीचा गैरव्यवहार झाला आहे. दादरमधील पीर बगदादी दर्ग्याच्या जागेच्या करारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.या दर्ग्याच्या टेरेस प्लॉटचा 4 हजार चौरस फूट एफएसआय एका हॉटेलला अतिशय कमी किंमतीत भाडेतत्वावर दिल्याचा आरोप होत आहे. केंद्रस्थानी एस. एस. काद्री वक्फ बोर्डाच्या वादग्रस्त व्यवहाराच्या केंद्रस्थानी आहेत, सीईओ एस. एस. काद्री. ते 2008पासून वक्फ बोर्डावर होते. पण घोटाळ्याच्या आरोपांनंतर या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले.औरंगाबादमधील ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याजवळची 20 एकर जागा विकसित करण्यासाठी टेंडर देताना गैरव्यवहार झाल्याबद्दल मिर्झा यांनी काद्री यांच्याविरोधात एफआयर दाखल केला आहे. सध्या ही जागा अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2010 04:50 PM IST

वक्फ भूखंड महाघोटाळा उघड

प्राची जतानिया, संजय वरकड

9 सप्टेंबर

गरजू मुस्लिमांच्या कल्याणासाठी राखून ठेवलेल्या वक्फ बोर्डाच्या देशभरातील लाखो एकर जमिनी वादात सापडल्या आहेत.मोक्याच्या जागी असणार्‍या या जमिनी कवडीमोल भावाने विकण्यात येत असल्याचें उघड झाले आहे. या जमिनींची किंमत 1 लाख 20 हजार कोटी रुपये आहे.

अल्पसंख्याक आयोगाने या भ्रष्टाचाराचा देशभरातील तपशील तयार केला आहे. यातून राजकारणी, धार्मिक नेते आणि बिल्डर्स यांचे लागेबांधेही उघड झाले आहेत.

औरंगाबाद आणि मुंबईतील जमिनी लाटल्या

औरंगाबादमधील निरालाबाजार या मध्यवर्ती भागातील वक्फ बोर्डाच्या ताब्यातील 14 एकर जागा निर्माण भारती डेव्हलपर्सला केवळ 8 कोटी रुपयांत विकण्यात आली. या जमिनीचा बाजारभाव आहे, तब्बल 60 कोटींपेक्षा जास्त. या करारावर सह्या झाल्या त्यावेळी काँग्रेसचे आमदार आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचे भाऊ दिलीप देशमुख हेही निर्माण भारतीच्या संचालक मंडळात होते.

आता हे प्रकरण हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे. याप्रकरणी दिलीप देशमुखांनी बोलण्यास नकार दिला. आपण केवळ 18 दिवसच संबंधित कंपनीचे संचालक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात 23 हजार मालमत्ता

महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडे वक्फच्या 23 हजार मालमत्ता आहेत. तर 92 हजार एकर जमीन आहे.सरकारच्या सर्व्हे रिपोर्टनुसार यातल्या 60 टक्के जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. शहरातील 300 कोटींचे सिटी सेंटर मॉलही पूर्वीच्या हाजी झकारिया अहमद पटेल मोमॅडियन अनाथाश्रम ट्रस्टच्या अनाथश्रमाच्या जागेवर उभा आहे.

आयबीएन-नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, मुंबई सेंट्रलमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अनाथाश्रमची 3 एकर जमीन त्याच्या ट्रस्टींनी केवळ 1 कोटी रुपयांना विकली. सप्टेंबर 2004 मध्ये ती नील कमल रिऍल्टर्स आणि बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडला विकण्यात आली. याचा बाजारभाव आहे तब्बल 100 कोटी. 100 कोटींचा हा भूखंड केवळ 1 कोटीला विकण्यात आला.

भाडेकरारांतही गैरव्यवहार

केवळ विक्रीतच नाही तर वक्फच्या जमिनी भाडेतत्वावर देतानासुद्धा कमालीचा गैरव्यवहार झाला आहे. दादरमधील पीर बगदादी दर्ग्याच्या जागेच्या करारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.या दर्ग्याच्या टेरेस प्लॉटचा 4 हजार चौरस फूट एफएसआय एका हॉटेलला अतिशय कमी किंमतीत भाडेतत्वावर दिल्याचा आरोप होत आहे.

केंद्रस्थानी एस. एस. काद्री

वक्फ बोर्डाच्या वादग्रस्त व्यवहाराच्या केंद्रस्थानी आहेत, सीईओ एस. एस. काद्री. ते 2008पासून वक्फ बोर्डावर होते. पण घोटाळ्याच्या आरोपांनंतर या महिन्याच्या सुरुवातीला त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले.

औरंगाबादमधील ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याजवळची 20 एकर जागा विकसित करण्यासाठी टेंडर देताना गैरव्यवहार झाल्याबद्दल मिर्झा यांनी काद्री यांच्याविरोधात एफआयर दाखल केला आहे. सध्या ही जागा अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2010 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close