S M L

ठाण्यातील रस्तेविकास रखडलेलाच

मनोज देवकर, विनय म्हात्रे, ठाणे10 सप्टेंबरठाणे जिल्ह्यात रस्त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे भविष्यात वाहतुकीवर याचा मोठा ताण पडणार आहे. मोनोरेल आणि जलवाहतुकीसारखे वाहतुकीचे पर्याय सुचवूनही सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. आता सरकारने वाहतुकीविषयी गंभीरतेने विचार करावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. मुंबईनंतर ठाणे जिल्ह्याचा जलद गतीने औद्योगिक विकास झाला. पण या विकासाबरोबर ठाणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गांचा विकास झाला नाही. ठाणे हे मुंबईला लागून असणारे मोठे शहर आहे. शहरातून अहमदाबाद नाशिक पुणे इकडे जाणारे महामार्ग आहेत. यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत आहे. सरकार या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असे आता ठाण्यातील लोकप्रतिनिधीच म्हणत आहेत. 2002मध्ये सागरी वाहतुकीचा पर्याय सुचवूनही सरकारने काहीच केले नाही, असे ताशेरे ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर ओढले आहेत.ठाण्यातील लोकप्रतिनिधींचा नाराजीचा सूर लक्षात घेता. ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी एक महिन्याच्या आत आराखडा तयार करण्यात यावा, असे आदेश आता जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात वाढलेल्या औद्योगिक पट्टयामुळे म्हणजेच जेएनपीटी, एपीएमसी आदी प्रकरल्पामुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील रस्त्यांवरुन होत असते. त्यामुळे रस्त्यांचा विकास झाला पाहिजे, या मागणीने आता जोर धरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 11:07 AM IST

ठाण्यातील रस्तेविकास रखडलेलाच

मनोज देवकर, विनय म्हात्रे, ठाणे

10 सप्टेंबर

ठाणे जिल्ह्यात रस्त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे भविष्यात वाहतुकीवर याचा मोठा ताण पडणार आहे. मोनोरेल आणि जलवाहतुकीसारखे वाहतुकीचे पर्याय सुचवूनही सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहे. आता सरकारने वाहतुकीविषयी गंभीरतेने विचार करावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करू लागले आहेत.

मुंबईनंतर ठाणे जिल्ह्याचा जलद गतीने औद्योगिक विकास झाला. पण या विकासाबरोबर ठाणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गांचा विकास झाला नाही. ठाणे हे मुंबईला लागून असणारे मोठे शहर आहे. शहरातून अहमदाबाद नाशिक पुणे इकडे जाणारे महामार्ग आहेत. यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत आहे. सरकार या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असे आता ठाण्यातील लोकप्रतिनिधीच म्हणत आहेत.

2002मध्ये सागरी वाहतुकीचा पर्याय सुचवूनही सरकारने काहीच केले नाही, असे ताशेरे ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर ओढले आहेत.

ठाण्यातील लोकप्रतिनिधींचा नाराजीचा सूर लक्षात घेता. ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी एक महिन्याच्या आत आराखडा तयार करण्यात यावा, असे आदेश आता जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी एमएमआरडीएला दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यात वाढलेल्या औद्योगिक पट्टयामुळे म्हणजेच जेएनपीटी, एपीएमसी आदी प्रकरल्पामुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील रस्त्यांवरुन होत असते. त्यामुळे रस्त्यांचा विकास झाला पाहिजे, या मागणीने आता जोर धरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close