S M L

सणांवर आचारसंहिता लागण्याची शक्यता

10 सप्टेंबरठाण्यात साजर्‍या होणार्‍या सणांवर आता आचारसंहितेचा लगाम लागण्याची शक्यता आहे. दहिहंडी, गणेशोत्सव, दांडिया यांसारख्या सणांचा वापर, राजकारणी कुरघोडी करण्यासाठी करत आहेत. त्यात नागरिकांचे हाल होत आहेत. तेव्हा सण साजरे करताना, नागरिकांना वेठीस धरू नये. सण साजरे करताना नियमांचे पालन करावे, अशा आशयाची याचिका, डॉ. महेश बेडेकर यांनी दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना, मुंबई हायकोर्टाने, गृहखात्याने अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली, एक समिती नेमून, ठाण्यात सार्वजनिकरित्या साजर्‍या केल्या जाणार्‍या सर्वच सणांबाबत आचारसंहिता ठरवावी, असे आदेश दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 11:21 AM IST

सणांवर आचारसंहिता लागण्याची शक्यता

10 सप्टेंबर

ठाण्यात साजर्‍या होणार्‍या सणांवर आता आचारसंहितेचा लगाम लागण्याची शक्यता आहे.

दहिहंडी, गणेशोत्सव, दांडिया यांसारख्या सणांचा वापर, राजकारणी कुरघोडी करण्यासाठी करत आहेत. त्यात नागरिकांचे हाल होत आहेत. तेव्हा सण साजरे करताना, नागरिकांना वेठीस धरू नये. सण साजरे करताना नियमांचे पालन करावे, अशा आशयाची याचिका, डॉ. महेश बेडेकर यांनी दाखल केली होती.

त्यावर निर्णय देताना, मुंबई हायकोर्टाने, गृहखात्याने अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली, एक समिती नेमून, ठाण्यात सार्वजनिकरित्या साजर्‍या केल्या जाणार्‍या सर्वच सणांबाबत आचारसंहिता ठरवावी, असे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close