S M L

पांढुर्णा येथे गोटमार यात्रा

10 सप्टेंबरएकमेकांवर तुफान दगडफेक करणारे लोक आज महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे दिसत आहेत. याला गोटमार यात्रा असे म्हटले जाते. एका प्रेमी युगुलाला विरोध म्हणून जाम नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या गावकर्‍यांमध्ये दगडफेक झाली. त्याचे स्मरण म्हणून ही धोंडाफेक केली जाते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. तर जुन्या काळात पेंढारी लोकांना शह देण्याकरिता गावकर्‍यांनी केलेल्या गोटमाराची आठवण यानिमित्ताने जागवली जात असल्याचे केल्याचेही सांगितले जाते. तेव्हापासून येथे पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी ही ऐतिहासिक गोटमार करण्याचा येथील नागरिकांचा प्रघात आहे. शेकडो वर्षाची प्राचीन परंपरा जोपासून ऐतिहासिक गोटमार यात्रा येथे भरत असते. सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पळसाच्या झाडाची मोठी फांदी आणून जाम नदीच्या पात्रात विधीवत पूजाअर्चा केली जाते. आणि नंतर ही पळसाची फांदी पांढुर्णा येथील भक्त आणण्याकरीता जाताच सावरगावचे भक्त गोटमारकडून विरोध करतात आणि येथूनच गोटमार यात्रेला प्रारंभ होतो. ती सुर्यास्तापर्यंत सुरू असते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 12:08 PM IST

पांढुर्णा येथे गोटमार यात्रा

10 सप्टेंबर

एकमेकांवर तुफान दगडफेक करणारे लोक आज महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे दिसत आहेत. याला गोटमार यात्रा असे म्हटले जाते.

एका प्रेमी युगुलाला विरोध म्हणून जाम नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या गावकर्‍यांमध्ये दगडफेक झाली. त्याचे स्मरण म्हणून ही धोंडाफेक केली जाते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते.

तर जुन्या काळात पेंढारी लोकांना शह देण्याकरिता गावकर्‍यांनी केलेल्या गोटमाराची आठवण यानिमित्ताने जागवली जात असल्याचे केल्याचेही सांगितले जाते.

तेव्हापासून येथे पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी ही ऐतिहासिक गोटमार करण्याचा येथील नागरिकांचा प्रघात आहे.

शेकडो वर्षाची प्राचीन परंपरा जोपासून ऐतिहासिक गोटमार यात्रा येथे भरत असते. सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पळसाच्या झाडाची मोठी फांदी आणून जाम नदीच्या पात्रात विधीवत पूजाअर्चा केली जाते.

आणि नंतर ही पळसाची फांदी पांढुर्णा येथील भक्त आणण्याकरीता जाताच सावरगावचे भक्त गोटमारकडून विरोध करतात आणि येथूनच गोटमार यात्रेला प्रारंभ होतो. ती सुर्यास्तापर्यंत सुरू असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close