S M L

गणेशोत्सवात घातपाताचा डाव

10 सप्टेंबर गणेशोत्सवा दरम्यान अतिरेकी मुंबईत घातपात घडवण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. दोन परदेशी नागरिक मुंबईत घुसल्याची माहिती जॉईंट सीपी हिमांशु रॉय यांनी दिली आहे. गर्दीच्या ठिकाणी घुसून जास्तीत जास्त हानी करण्याचा यांचा डाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोन्ही नागरिकांचे फोटोही पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. एकाचे नाव कलिमुद्दीन खान उर्फ रामेश्वर पंडीत आणि दुसर्‍याचे नाव हाफीज शरीफ असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.नागरिकांनी या फोटोमधील दोघे कुठेही दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2010 12:49 PM IST

गणेशोत्सवात घातपाताचा डाव

10 सप्टेंबर

गणेशोत्सवा दरम्यान अतिरेकी मुंबईत घातपात घडवण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

दोन परदेशी नागरिक मुंबईत घुसल्याची माहिती जॉईंट सीपी हिमांशु रॉय यांनी दिली आहे. गर्दीच्या ठिकाणी घुसून जास्तीत जास्त हानी करण्याचा यांचा डाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या दोन्ही नागरिकांचे फोटोही पोलिसांनी प्रसिद्ध केले आहेत. एकाचे नाव कलिमुद्दीन खान उर्फ रामेश्वर पंडीत आणि दुसर्‍याचे नाव हाफीज शरीफ असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नागरिकांनी या फोटोमधील दोघे कुठेही दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2010 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close