S M L

कोल्हापुरात ईद आणि गणेशोत्सव एकत्र

प्रताप नाईक, कोल्हापूर 11 सप्टेंबरहिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून कोल्हापुरातील हजरत पीर बाबुजमाल कलंदर शाह दर्ग्याला ओळखले जाते. या दर्ग्याचे वैशिष्टय म्हणजे या दर्ग्याच्या कमानीवरच विघ्नहर्त्या गणेशाची मूर्ती आहे. मानवता हाच धर्म आणि माणुसकी हेच जीवन हा संदेश इथे दिला जातो. हजरत पीर शहाजमाल उर्फ बाबुजमाल कलंदर हा सुमारे 700 ते 800 वर्षापुर्वीचा जुना पुरातन दर्गा शरीफ सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. या दर्ग्यामध्ये सुरुवातीलाच गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते आणि प्रवेश करताच दर्शन होते, हजरत पीर बाबुजमालचे. दर्ग्यावर असणार्‍या गणेशाच्या मूर्तीचा इतिहास रोमांचकारी आहे.कर्नाटकात युद्धावर जाणार्‍या पेशव्यांनी इथे नवस केला. नवसपूर्ती म्हणून त्यांनी या दर्ग्याचे चार मिनार बांधले.आणि कमान बांधून इथे गणपतीची मूर्ती ठेवली. नंतर कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे राज्य असल्याने हा सर्वधर्मसमभाव सांभाळला गेला. एकाच वेळी विघ्नहर्त्या गणेशाचे आणि हजरत पीर बाबूजमाल यांचे दर्शन होत असल्याने सर्वधर्मीयांची इथे मोठ्या संख्येने गर्दी होते.एरवीही इथे श्री गणेशाची नित्य नियमाने पूजा केली जाते.मानवता हाच खरा धर्म असतो, असा संदेश देणार्‍या बाबू जमाल दर्ग्याचंे उदाहरण, हिंदू मुस्लिम ऐक्याचे निव्वळ कागदी नव्हे, तर अगदी प्रत्यक्ष उदाहरण आहे. तसेच माथी फिरवून दंगल भडकविण्यार्‍यांना एक चपराकही...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 12:06 PM IST

कोल्हापुरात ईद आणि गणेशोत्सव एकत्र

प्रताप नाईक, कोल्हापूर

11 सप्टेंबर

हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून कोल्हापुरातील हजरत पीर बाबुजमाल कलंदर शाह दर्ग्याला ओळखले जाते. या दर्ग्याचे वैशिष्टय म्हणजे या दर्ग्याच्या कमानीवरच विघ्नहर्त्या गणेशाची मूर्ती आहे. मानवता हाच धर्म आणि माणुसकी हेच जीवन हा संदेश इथे दिला जातो.

हजरत पीर शहाजमाल उर्फ बाबुजमाल कलंदर हा सुमारे 700 ते 800 वर्षापुर्वीचा जुना पुरातन दर्गा शरीफ सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. या दर्ग्यामध्ये सुरुवातीलाच गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते आणि प्रवेश करताच दर्शन होते, हजरत पीर बाबुजमालचे. दर्ग्यावर असणार्‍या गणेशाच्या मूर्तीचा इतिहास रोमांचकारी आहे.

कर्नाटकात युद्धावर जाणार्‍या पेशव्यांनी इथे नवस केला. नवसपूर्ती म्हणून त्यांनी या दर्ग्याचे चार मिनार बांधले.आणि कमान बांधून इथे गणपतीची मूर्ती ठेवली. नंतर कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे राज्य असल्याने हा सर्वधर्मसमभाव सांभाळला गेला. एकाच वेळी विघ्नहर्त्या गणेशाचे आणि हजरत पीर बाबूजमाल यांचे दर्शन होत असल्याने सर्वधर्मीयांची इथे मोठ्या संख्येने गर्दी होते.

एरवीही इथे श्री गणेशाची नित्य नियमाने पूजा केली जाते.मानवता हाच खरा धर्म असतो, असा संदेश देणार्‍या बाबू जमाल दर्ग्याचंे उदाहरण, हिंदू मुस्लिम ऐक्याचे निव्वळ कागदी नव्हे, तर अगदी प्रत्यक्ष उदाहरण आहे. तसेच माथी फिरवून दंगल भडकविण्यार्‍यांना एक चपराकही...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close