S M L

विलासरावांच्या मुंबईतील घरात गणपती

11 सप्टेंबरकेंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांच्याही घरी आज गणपतीची पूजा झाली. विलासरावांनी सपत्निक ही पूजा केली. दिल्लीला घर मिळाले असले तरीही विलासरावांनी मुंबईतीलच आपल्या घरी गणपती बसवला आहे. त्यामुळे, विलासरावांचे मुंबईवरील प्रेम आजही आटले नसल्याचे दिसून आले आहे. विलासरावांसोबत त्यांचा अभिनेता मुलगा रितेश देशमुखही हजर होता. संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र येऊन हा सण साजरा करत असल्याचा आनंद आहे, असे विलासरावांनी म्हटले आहे. आज ईद आणि गणेशोत्सव एकत्र येण्यामागे हिंदू मुस्लिम एकता अखंड राहावी हाच उद्देश असावा, असेही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2010 12:41 PM IST

विलासरावांच्या मुंबईतील घरात गणपती

11 सप्टेंबर

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांच्याही घरी आज गणपतीची पूजा झाली. विलासरावांनी सपत्निक ही पूजा केली. दिल्लीला घर मिळाले असले तरीही विलासरावांनी मुंबईतीलच आपल्या घरी गणपती बसवला आहे.

त्यामुळे, विलासरावांचे मुंबईवरील प्रेम आजही आटले नसल्याचे दिसून आले आहे. विलासरावांसोबत त्यांचा अभिनेता मुलगा रितेश देशमुखही हजर होता.

संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र येऊन हा सण साजरा करत असल्याचा आनंद आहे, असे विलासरावांनी म्हटले आहे. आज ईद आणि गणेशोत्सव एकत्र येण्यामागे हिंदू मुस्लिम एकता अखंड राहावी हाच उद्देश असावा, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2010 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close