S M L

प्रदेशाध्यक्ष निवडीचे अधिकार सोनियांना

13 सप्टेंबरमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आले आहेत. तसा ठराव आज प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. खासदार एकनाथ गायकवाड यांनी मांडलेल्या ठरावावर ए. आर. अंतुले, पद्माकर वळवी, सुधाकर गणगणे यांनी अनुमोदन दिले. सध्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नावाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचा विरोध आहे.तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकारसुद्धा सोनिया गांधींना देण्यात येणार आहेत. कृपाशंकर सिंह यांच्या नावाला केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांनी कडाडून विरोध केला आहे. एकूणच प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई प्रदेशअध्यक्ष या दोन्ही पदांच्या निवडणूका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 10:01 AM IST

प्रदेशाध्यक्ष निवडीचे अधिकार सोनियांना

13 सप्टेंबर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्यात आले आहेत. तसा ठराव आज प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

खासदार एकनाथ गायकवाड यांनी मांडलेल्या ठरावावर ए. आर. अंतुले, पद्माकर वळवी, सुधाकर गणगणे यांनी अनुमोदन दिले. सध्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नावाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांचा विरोध आहे.

तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकारसुद्धा सोनिया गांधींना देण्यात येणार आहेत. कृपाशंकर सिंह यांच्या नावाला केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांनी कडाडून विरोध केला आहे.

एकूणच प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई प्रदेशअध्यक्ष या दोन्ही पदांच्या निवडणूका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close