S M L

बोट बुडून जळगावातील 10 भाविकांना जलसमाधी

13 सप्टेंबरमध्यप्रदेशातील ओंकारेश्वर नर्मदा- कावेरी संगम इथे भाविकांना घेऊन जाणारी बोट बुडून रावेरमधील 10जणांना जलसमाधी मिळाली आहे. रविवारी रात्री ही दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत दोघांचे मृतदेह सापडले असून 8 जण बेपत्ता आहेत. हे सर्व भाविक जळगावच्या रावेर तालुक्यातील विटवा गावचे रहिवासी आहेत. कावेरी नदीत 520 मेगावॅट विद्युत निमिर्ती केंद्राच्या 8 टर्बाईन सुरू असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना मध्यप्रदेश सरकारने प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2010 04:21 PM IST

बोट बुडून जळगावातील 10 भाविकांना जलसमाधी

13 सप्टेंबर

मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर नर्मदा- कावेरी संगम इथे भाविकांना घेऊन जाणारी बोट बुडून रावेरमधील 10जणांना जलसमाधी मिळाली आहे.

रविवारी रात्री ही दुर्घटना घडली आहे. आतापर्यंत दोघांचे मृतदेह सापडले असून 8 जण बेपत्ता आहेत. हे सर्व भाविक जळगावच्या रावेर तालुक्यातील विटवा गावचे रहिवासी आहेत.

कावेरी नदीत 520 मेगावॅट विद्युत निमिर्ती केंद्राच्या 8 टर्बाईन सुरू असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना मध्यप्रदेश सरकारने प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2010 04:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close