S M L

आरोग्य सुधारणेचा भगिरथ प्रयत्न

दिनेश केळुसकर,रत्नागिरी11 सप्टेंबरदेशातील गरीब कष्टकरी जनतेला आपल्या उत्पन्नाचा तीस टक्क्यांहून जास्त भाग आजारांवर खर्च करावा लागतो. त्यातून दारिद्र्य वाढतच जाते. त्यामुळे आरोग्य हे डॉक्टर केंद्री न होता ते ज्ञानकेंद्री झाले, तर प्रगतीचा कळस गाठणे शक्य होईल हा विचार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगिरथ प्रतिष्ठान ही संस्था गेली 9 वर्षे ग्रामीण भागात सामाजिक सुधारणांचे काम करत आहे. भगिरथ प्रतिष्ठानने झाराप पंचक्रोशीतील एका शाळेत अनोखा प्रयोग राबवला. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन-दोन कोंबड्या घरी पाळायला दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या आहारात अंडी आली आणि त्यांची प्रोटीनची गरज भागली. शिवाय त्या कुटुंबाचे अर्थकारणही सुधारू लागले. यातूनच गावातल्या तरुण उद्योजकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपला पोल्ट्री व्यवसाय सुरू केला.हे करत असतानाच ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणा-या ऍनिमिया हटावची मोहीमही भगिरथने हाती घेतली आहे. म्हणूनच भगिरथने ग्रामविकासाला आरोग्याची जोड दिली. हे भगिरथ मॉडेल आयुष्याचा दर्जा सुधारणारे असल्याने त्याकडे आता आदर्श म्हणून बघितले जात आहे.या भगिरथ प्रतिष्ठानला तुम्ही मदत देऊ शकता - आर्थिक स्वरुपात आणिऍग्रीकल्चर आणि व्हेटर्नरी शाखेतील एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांचा सहभाग, चार संगणकांची संस्थेला सध्या गरज आणिसेवाभावी स्वयंसेवकांचीही आवश्यकता.चेक किंवा ड्राफ्ट देण्यासाठी पत्ता - पत्ता : भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान मु.पो. झाराप , तालुका :कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग : पिन: 416 520 फोन नंबर : 9422596500Email : bhagirathgram@gmail.com

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2010 04:09 PM IST

आरोग्य सुधारणेचा भगिरथ प्रयत्न

दिनेश केळुसकर,रत्नागिरी

11 सप्टेंबर

देशातील गरीब कष्टकरी जनतेला आपल्या उत्पन्नाचा तीस टक्क्यांहून जास्त भाग आजारांवर खर्च करावा लागतो. त्यातून दारिद्र्य वाढतच जाते. त्यामुळे आरोग्य हे डॉक्टर केंद्री न होता ते ज्ञानकेंद्री झाले, तर प्रगतीचा कळस गाठणे शक्य होईल हा विचार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगिरथ प्रतिष्ठान ही संस्था गेली 9 वर्षे ग्रामीण भागात सामाजिक सुधारणांचे काम करत आहे.

भगिरथ प्रतिष्ठानने झाराप पंचक्रोशीतील एका शाळेत अनोखा प्रयोग राबवला. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन-दोन कोंबड्या घरी पाळायला दिल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या आहारात अंडी आली आणि त्यांची प्रोटीनची गरज भागली. शिवाय त्या कुटुंबाचे अर्थकारणही सुधारू लागले. यातूनच गावातल्या तरुण उद्योजकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आपला पोल्ट्री व्यवसाय सुरू केला.

हे करत असतानाच ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणा-या ऍनिमिया हटावची मोहीमही भगिरथने हाती घेतली आहे. म्हणूनच भगिरथने ग्रामविकासाला आरोग्याची जोड दिली.

हे भगिरथ मॉडेल आयुष्याचा दर्जा सुधारणारे असल्याने त्याकडे आता आदर्श म्हणून बघितले जात आहे.

या भगिरथ प्रतिष्ठानला तुम्ही मदत देऊ शकता -

आर्थिक स्वरुपात आणिऍग्रीकल्चर आणि व्हेटर्नरी शाखेतील एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांचा सहभाग, चार संगणकांची संस्थेला सध्या गरज आणिसेवाभावी स्वयंसेवकांचीही आवश्यकता.

चेक किंवा ड्राफ्ट देण्यासाठी पत्ता -

पत्ता : भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान मु.पो. झाराप , तालुका :कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग : पिन: 416 520 फोन नंबर : 9422596500Email : bhagirathgram@gmail.com

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2010 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close