S M L

बट्ट यांनी घेतली पवारांची भेट

16 सप्टेंबरपाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इजाझ बट्ट यांनी आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्ली इथे आज भेट घेतली. चर्चेचा मुख्य मुद्दा अर्थातच स्पॉट फिक्सिंग प्रकरण आणि तीन पाक खेळाडूंवर आयसीसीने लादलेली बंदी हा होता. त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सीरिज पुन्हा सुरु करता येईल का, यावर त्यांनी चर्चा केली. तसेच भारतीय उपखंडात पुढच्या वर्षी होणार्‍या वन डे वर्ल्डकपबद्दल बट्ट यांनी चौकशी केली. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाक खेळाडूंची चौकशी सुरू असून ही चौकशी संपल्यानंतरच त्याबाबत कारवाई करण्यात येईल, असेही इजाझ बट्ट यांनी सांगितले. ही चौकशी संपल्यानंतर स्कॉटलंड यार्डचे पोलीस या खेळाडूंना आपल्या देशात जाऊ देतील असेही ते म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2010 11:43 AM IST

बट्ट यांनी घेतली पवारांची भेट

16 सप्टेंबर

पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इजाझ बट्ट यांनी आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्ली इथे आज भेट घेतली. चर्चेचा मुख्य मुद्दा अर्थातच स्पॉट फिक्सिंग प्रकरण आणि तीन पाक खेळाडूंवर आयसीसीने लादलेली बंदी हा होता.

त्याशिवाय भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सीरिज पुन्हा सुरु करता येईल का, यावर त्यांनी चर्चा केली. तसेच भारतीय उपखंडात पुढच्या वर्षी होणार्‍या वन डे वर्ल्डकपबद्दल बट्ट यांनी चौकशी केली.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाक खेळाडूंची चौकशी सुरू असून ही चौकशी संपल्यानंतरच त्याबाबत कारवाई करण्यात येईल, असेही इजाझ बट्ट यांनी सांगितले.

ही चौकशी संपल्यानंतर स्कॉटलंड यार्डचे पोलीस या खेळाडूंना आपल्या देशात जाऊ देतील असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2010 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close