S M L

बीजिंगमध्येही बाप्पाचा उत्सव

सीटीझन जर्नलिस्ट यशस्वी पाटील, बीजिंग17 सप्टेंबरसध्या देशासोबत विदेशातही गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. बीजिंगमध्येही गणेशोत्सव मोठ्या जोशात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवासाठीच्या डेकोरेशनसाठी चायनीज वस्तूंची मार्केटमध्ये रेलचेल असते. याच चीनच्या राजधानी बीजिंगमध्ये मोरेश्वर रबाडे कुटुंबीयांनी प्रतिष्ठापना केलेला गणपती सध्या तेथील आकर्षण ठरला आहे. व्यवसायानिमित्त रबाडे आता चीनमध्ये स्थायिक झालेत. पण आपली मराठमोळी परंपरा मात्र ते विसरलेले नाहीत. चीनमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोरेश्वर आणि रेखा रबाडे यांनी खास गिरगावातून गणेशमूर्ती आयात केली. गिरगावातील मुगभाटयेथील शिल्पकार माधूसकर यांनी ही मूर्ती घडवली आहे. यंदा तर गणेशोत्सवासोबत त्यांनी गौरीचेही पूजन केले आहे. पारंपरिक पध्दतीने मखर सजावट करण्यासाठी त्यांनी बहुतांश वस्तू या भारतातूनचंआयात केल्या आहेत. गणेशोत्सव बीजिंगमधील असला तरी गणेशाची पूजा मात्र साग्र संगीत केली जाते. या गणेशोत्सवाला बीजिंगमधल्या गणेशभक्तांनी आवर्जून हजेरी लावली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2010 12:57 PM IST

बीजिंगमध्येही बाप्पाचा उत्सव

सीटीझन जर्नलिस्ट यशस्वी पाटील, बीजिंग17 सप्टेंबर

सध्या देशासोबत विदेशातही गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. बीजिंगमध्येही गणेशोत्सव मोठ्या जोशात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवासाठीच्या डेकोरेशनसाठी चायनीज वस्तूंची मार्केटमध्ये रेलचेल असते.

याच चीनच्या राजधानी बीजिंगमध्ये मोरेश्वर रबाडे कुटुंबीयांनी प्रतिष्ठापना केलेला गणपती सध्या तेथील आकर्षण ठरला आहे. व्यवसायानिमित्त रबाडे आता चीनमध्ये स्थायिक झालेत.

पण आपली मराठमोळी परंपरा मात्र ते विसरलेले नाहीत. चीनमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोरेश्वर आणि रेखा रबाडे यांनी खास गिरगावातून गणेशमूर्ती आयात केली.

गिरगावातील मुगभाटयेथील शिल्पकार माधूसकर यांनी ही मूर्ती घडवली आहे. यंदा तर गणेशोत्सवासोबत त्यांनी गौरीचेही पूजन केले आहे.

पारंपरिक पध्दतीने मखर सजावट करण्यासाठी त्यांनी बहुतांश वस्तू या भारतातूनचंआयात केल्या आहेत. गणेशोत्सव बीजिंगमधील असला तरी गणेशाची पूजा मात्र साग्र संगीत केली जाते.

या गणेशोत्सवाला बीजिंगमधल्या गणेशभक्तांनी आवर्जून हजेरी लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2010 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close