S M L

जामा मशिदीबाहेर गोळीबार

19 सप्टेंबरदिल्लीत कॉमनवेल्थ गेम्सचा काऊन्टडाऊन सुरू झाले आहे, पण त्यापूर्वीच दिल्लीतल्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. कडक सुरक्षाव्यवस्था असणार्‍या जामा मशिदीच्या गेट नंबर तीन जवळ परदेशी पर्यंटकांच्या बसवर गोळीबार करण्यात आला आहे. दोन तरुण मोटरसायकलवरुन आले आणि त्यांनी मशिनगनच्या सहाय्यानं या बसवर गोळीबार केला. यात दोन परदेशी पर्यटक जखमी झाले आहे. गोळीबार करुन हे दोघं तरुण फरार झाले. दरम्यान जखमी झालेले दोन परदेशी नागरिक हे तैवानचे आहेत. ते दक्षिण दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांच्यासोबत बसमध्ये आणखी सहा परदेशी पर्यटक होते. या दोन्ही जखमी पर्यटकांवर दिल्लीच्या एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.दरम्यान जामा मशीद परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. इथे येणार्‍या प्रत्येकाची तपासणी आणि चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर फरार झालेल्या दोन्ही हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी आता सुरू केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2010 12:48 PM IST

जामा मशिदीबाहेर गोळीबार

19 सप्टेंबर

दिल्लीत कॉमनवेल्थ गेम्सचा काऊन्टडाऊन सुरू झाले आहे, पण त्यापूर्वीच दिल्लीतल्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

कडक सुरक्षाव्यवस्था असणार्‍या जामा मशिदीच्या गेट नंबर तीन जवळ परदेशी पर्यंटकांच्या बसवर गोळीबार करण्यात आला आहे. दोन तरुण मोटरसायकलवरुन आले आणि त्यांनी मशिनगनच्या सहाय्यानं या बसवर गोळीबार केला.

यात दोन परदेशी पर्यटक जखमी झाले आहे. गोळीबार करुन हे दोघं तरुण फरार झाले. दरम्यान जखमी झालेले दोन परदेशी नागरिक हे तैवानचे आहेत.

ते दक्षिण दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांच्यासोबत बसमध्ये आणखी सहा परदेशी पर्यटक होते. या दोन्ही जखमी पर्यटकांवर दिल्लीच्या एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान जामा मशीद परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. इथे येणार्‍या प्रत्येकाची तपासणी आणि चौकशी केली जात आहे.

त्याचबरोबर फरार झालेल्या दोन्ही हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी आता सुरू केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2010 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close