S M L

मॅच फिक्सिंगवरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमध्येच जुंपली

19 सप्टेंबरस्पॉट फिक्सिंगच्या ताज्या आरोपामुळे पाकिस्तान क्रिकेटला पुन्हा दणका बसला आहे. पण पाक क्रिकेट बोर्डाने अजूनही आपण यातले नव्हेच ही भूमिका कायम ठेवली. आयसीसीने वन डे मॅचची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तर चौकशीचा आदेश देण्यापूर्वी आयसीसीने पाक बोर्डाला विश्वासात घेतलं नाही, अस या निर्णयावर पाक बोर्डाने टीका केली. शिवाय पाक खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले असल्याचं सिद्ध करणारे पुरावे सादर करण्याचं आवाहन त्यांनी आयसीसीला केले आहे. पाक बोर्डाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनंतर आयसीसीने केलेली कारवाई आम्हाला रुचलेली नाही. आम्ही आयसीसीचे सदस्य आहोत. पण वन डे मॅचची चौकशी होणार आहे, हे आम्हाला मीडियाकडून समजले. आयसीसीपैकी कोणी आम्हाला कळवण्याची तसदी घेतली नाही. आयसीसीने आपल्या सदस्य बोर्डांवर जास्त विश्वास दाखवायला हवा. दरम्यान पाकिस्तानच्या वन डे टीमचा कॅप्टन शाहीद आफ्रिदीनेही स्पॉट फिक्सिंगचे आरोप फेटाळून लावले. आम्ही खुप चांगलं क्रिकेट खेळलो. आणि जिंकण्याच्याच ईर्ष्येने खेळलो. नवीन आरोप खच्चीकरण व्हावं म्हणून केले जात आहेत. बाकी या आरोपात तथ्य नाही. लॉर्ड्स टेस्ट झाल्यापासून आमचे खेळाडू प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. पण आमचं काम क्रिकेट खेळणं हे आहे. याची जाणीव त्यांना आहे. आम्ही आता सीरिजमधल्या उरलेल्या दोन वन डे मॅचवर लक्ष केंद्रीत केले. या मॅच जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2010 01:08 PM IST

मॅच फिक्सिंगवरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमध्येच जुंपली

19 सप्टेंबर

स्पॉट फिक्सिंगच्या ताज्या आरोपामुळे पाकिस्तान क्रिकेटला पुन्हा दणका बसला आहे. पण पाक क्रिकेट बोर्डाने अजूनही आपण यातले नव्हेच ही भूमिका कायम ठेवली.

आयसीसीने वन डे मॅचची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तर चौकशीचा आदेश देण्यापूर्वी आयसीसीने पाक बोर्डाला विश्वासात घेतलं नाही, अस या निर्णयावर पाक बोर्डाने टीका केली.

शिवाय पाक खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले असल्याचं सिद्ध करणारे पुरावे सादर करण्याचं आवाहन त्यांनी आयसीसीला केले आहे.

पाक बोर्डाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनंतर आयसीसीने केलेली कारवाई आम्हाला रुचलेली नाही.

आम्ही आयसीसीचे सदस्य आहोत. पण वन डे मॅचची चौकशी होणार आहे, हे आम्हाला मीडियाकडून समजले. आयसीसीपैकी कोणी आम्हाला कळवण्याची तसदी घेतली नाही.

आयसीसीने आपल्या सदस्य बोर्डांवर जास्त विश्वास दाखवायला हवा. दरम्यान पाकिस्तानच्या वन डे टीमचा कॅप्टन शाहीद आफ्रिदीनेही स्पॉट फिक्सिंगचे आरोप फेटाळून लावले.

आम्ही खुप चांगलं क्रिकेट खेळलो. आणि जिंकण्याच्याच ईर्ष्येने खेळलो. नवीन आरोप खच्चीकरण व्हावं म्हणून केले जात आहेत. बाकी या आरोपात तथ्य नाही.

लॉर्ड्स टेस्ट झाल्यापासून आमचे खेळाडू प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. पण आमचं काम क्रिकेट खेळणं हे आहे. याची जाणीव त्यांना आहे.

आम्ही आता सीरिजमधल्या उरलेल्या दोन वन डे मॅचवर लक्ष केंद्रीत केले. या मॅच जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2010 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close