S M L

आरोग्य खेड्याकडे चला...

प्रवीण मनोहर, मुंबई18 सप्टेंबरअमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एक डॉक्टर दांपत्य गेली 13 वर्षे आदिवासींची सेवा करत आहे. महात्मा गांधींच्या 'खेड्याकडे चला' या संदेशाने झपाटलेल्या डॉ. आशिष आणि कविता सातव यांनी महान आणि कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या माध्यमातून मेळघाटातील आरोग्यावर काम सुरू केले. मेळघाटातील धारणी जवळ असलेल्या उतवलीतील कर्मग्राममध्ये कोरकू आदिवासी मोठ्या विश्वासाने येतो. एमबीबीएसची डिग्री घेतल्यानंतर खोर्‍याने पैसे कमवायची संधी असतानाही डॉ. आशिष सातव यांनी मेळघाटात काम करण्याचे ठरवले. नेत्ररोगतज्ज्ञ असणार्‍या पत्नीसह ते इथे आले आणि इथलेच झाले. नेत्ररोगतज्ज्ञ असणार्‍या डॉ. कविता यांना आदिवासी प्रथा मोडाव्या लागल्या. आदिवासींना त्यांनी विज्ञानतंत्र समजावले. आदिवासी डोळ्यांसारख्या नाजूक अवयवाला त्यांच्या पध्दतीत ट्रिट करायचे.कुपोषण किंवा बालमृत्यूपासून आदिवासींची सुटका करायची असेल, तर लोकसहभाग हवा, या भूमिकेतून डॉक्टर सातवांनी आदिवासी महिलांना आरोग्य दूत बनवले. सातवी शिकलेल्या सुमित्राबाईंना नवजात बालकाची काळजी घेणे, आपले कर्तव्य वाटते. बाळ आणि आई सुदृढ राहावी, यासाठी डॉक्टरांनी परस बागेची स्वस्त कल्पना साकारली.मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांची नाडी डॉ. सातव दांपत्याला कळली आहे. आतापर्यंत 40 हजार आदिवासींवर त्यांनी उपचार केले आहेत.डॉ. सातव यांच्या महान या संस्थेला मदत देऊन तुम्हीही हातभार लावू शकता. महान संस्थेला निधी देऊन मदत करु शकता. तसेच मेडिकल साधने, सर्जिकल मशिन्स संस्थेला देऊ शकता. याशिवाय डॉक्टर तसेच गावपातळीवर कार्यकर्ते या आरोग्यसेवेत सहभागी होऊ शकतील. त्यासाठी संस्थेचा पत्ता आहे- पत्ता : डॉ. आशिष सातव, महात्मा गांधी आदिवासी हॉस्पिटल,कर्मग्राम, उतवली, ता. धारणी, अमरावती - 444702ई-मेल : drsatav@rediffmail.comफोन नं : 07226-202793, 202291मोबाईल नं : 9423118877

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2010 05:18 PM IST

आरोग्य खेड्याकडे चला...

प्रवीण मनोहर, मुंबई

18 सप्टेंबर

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एक डॉक्टर दांपत्य गेली 13 वर्षे आदिवासींची सेवा करत आहे. महात्मा गांधींच्या 'खेड्याकडे चला' या संदेशाने झपाटलेल्या डॉ. आशिष आणि कविता सातव यांनी महान आणि कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या माध्यमातून मेळघाटातील आरोग्यावर काम सुरू केले.

मेळघाटातील धारणी जवळ असलेल्या उतवलीतील कर्मग्राममध्ये कोरकू आदिवासी मोठ्या विश्वासाने येतो. एमबीबीएसची डिग्री घेतल्यानंतर खोर्‍याने पैसे कमवायची संधी असतानाही डॉ. आशिष सातव यांनी मेळघाटात काम करण्याचे ठरवले. नेत्ररोगतज्ज्ञ असणार्‍या पत्नीसह ते इथे आले आणि इथलेच झाले.

नेत्ररोगतज्ज्ञ असणार्‍या डॉ. कविता यांना आदिवासी प्रथा मोडाव्या लागल्या. आदिवासींना त्यांनी विज्ञानतंत्र समजावले. आदिवासी डोळ्यांसारख्या नाजूक अवयवाला त्यांच्या पध्दतीत ट्रिट करायचे.

कुपोषण किंवा बालमृत्यूपासून आदिवासींची सुटका करायची असेल, तर लोकसहभाग हवा, या भूमिकेतून डॉक्टर सातवांनी आदिवासी महिलांना आरोग्य दूत बनवले. सातवी शिकलेल्या सुमित्राबाईंना नवजात बालकाची काळजी घेणे, आपले कर्तव्य वाटते. बाळ आणि आई सुदृढ राहावी, यासाठी डॉक्टरांनी परस बागेची स्वस्त कल्पना साकारली.

मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांची नाडी डॉ. सातव दांपत्याला कळली आहे. आतापर्यंत 40 हजार आदिवासींवर त्यांनी उपचार केले आहेत.

डॉ. सातव यांच्या महान या संस्थेला मदत देऊन तुम्हीही हातभार लावू शकता. महान संस्थेला निधी देऊन मदत करु शकता. तसेच मेडिकल साधने, सर्जिकल मशिन्स संस्थेला देऊ शकता. याशिवाय डॉक्टर तसेच गावपातळीवर कार्यकर्ते या आरोग्यसेवेत सहभागी होऊ शकतील.

त्यासाठी संस्थेचा पत्ता आहे-

पत्ता :

डॉ. आशिष सातव, महात्मा गांधी आदिवासी हॉस्पिटल,कर्मग्राम, उतवली, ता. धारणी, अमरावती - 444702ई-मेल : drsatav@rediffmail.comफोन नं : 07226-202793, 202291मोबाईल नं : 9423118877

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2010 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close