S M L

गोळीबार करणार्‍यांचा ठावठिकाणा नाही

20 सप्टेंबरजामा मशिदीच्या गेट नंबर तीनजवळ गोळीबार करणार्‍यांचा अजूनही काही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांच्यापर्यंत पोचण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही. कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर एक घबराटीचे वातावरण पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने भारताला सावधानतेचा इशारा दिला आहे. यापेक्षाही मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा, ऑस्ट्रेलियाने दिला आहे. दिल्लीत झालेल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीसह देशभरातील मेट्रो सिटीजमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियासोबतच अमेरिका आणि इंग्लंडने त्यांच्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 10:15 AM IST

गोळीबार करणार्‍यांचा ठावठिकाणा नाही

20 सप्टेंबर

जामा मशिदीच्या गेट नंबर तीनजवळ गोळीबार करणार्‍यांचा अजूनही काही ठावठिकाणा लागलेला नाही.

त्यांच्यापर्यंत पोचण्यात अजूनही पोलिसांना यश आलेले नाही.

कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर एक घबराटीचे वातावरण पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाने भारताला सावधानतेचा इशारा दिला आहे.

यापेक्षाही मोठे दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा, ऑस्ट्रेलियाने दिला आहे.

दिल्लीत झालेल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीसह देशभरातील मेट्रो सिटीजमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियासोबतच अमेरिका आणि इंग्लंडने त्यांच्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close