S M L

अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे आवाहन

20 सप्टेंबरअयोध्येच्या वादावर 24 सप्टेंबरला कोर्ट निकाल देणार आहे. या निकालानंतर शांतता राखण्याचे आवाहन सर्वचपातळ्यांवरून केले जात आहे. राज्य सरकारनेही त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. सगळ्या पालकमंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागातच 28 सप्टेंबरपर्यंत राहून शांतता राखावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये वेगवेगळ्या बैठका घेतल्या. यात त्यांनी सर्व धर्मांच्या नेत्यांची भेट घेतली. शांतता भंग करणारे एसएमएस पाठवणार्‍यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचेही यावेळी भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 11:18 AM IST

अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे आवाहन

20 सप्टेंबर

अयोध्येच्या वादावर 24 सप्टेंबरला कोर्ट निकाल देणार आहे. या निकालानंतर शांतता राखण्याचे आवाहन सर्वचपातळ्यांवरून केले जात आहे.

राज्य सरकारनेही त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. सगळ्या पालकमंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागातच 28 सप्टेंबरपर्यंत राहून शांतता राखावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये वेगवेगळ्या बैठका घेतल्या. यात त्यांनी सर्व धर्मांच्या नेत्यांची भेट घेतली.

शांतता भंग करणारे एसएमएस पाठवणार्‍यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचेही यावेळी भुजबळ यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close