S M L

गिलानींची ताठर भूमिका कायम

20 सप्टेंबरकाश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल झाले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर फुटीरवादी नेते मिरवाईज आणि गिलानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. श्रीनगरला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका गटाने आज हुर्रियतनेते सय्यद अली शहा गिलानी यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन गिलानी यांना करण्यात आले. सिताराम येचुरी यांनी गिलानी यांच्याशी चर्चा केली. मात्र भारत सरकार जोपर्यंत पाच कलमी प्रस्ताव मान्य करणार नाही, तोपर्यंत शांतता निर्माण होणार नाही असे सांगत गिलानी यांनी आपली ताठर भूमिका कायम ठेवली. येचुरी जेकेएलएफचा नेते यासिन मलिकचीही भेट घेणार आहेत.आज दिवसभरात काश्मीरमध्ये काय काय घडले त्याचा हा वृत्तांत...केंद्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये दाखल झाले. या शिष्टमंडळातील सदस्यांनी दिवसभरात अनेक पक्षनेते आणि सर्वसामान्य लोकांच्या भेटी घेतल्या. फुटीरवादी नेत्यांनी या शिष्टमंडळात सहभागी व्हायला नकार दिला. पण या शिष्टमंडळातल नेत्यांनी सामंजस्याची भूमिका दाखवली आणि या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या. काश्मीरमधील प्रत्येक गटाची भूमिका या नेत्यांना जाणून घ्यायची आहे, हा संदेश या निमित्ताने काश्मीरमध्ये पोहोचला. बीबी जानच्या नातवाला दगडफेक केल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोडवण्यासाठी पोलीस माझ्याकडे 20 हजार रुपये मागतात, अशी कैफियत तिने दिल्लीहून आलेल्या 37 सदस्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासमोर मांडली. काश्मीरला पोचल्यावर या शिष्टमंडळाचे स्वागत थंड प्रतिसादाने झाले. कर्फ्यू हटवला जात नाही, तोवर चर्चेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका मुख्य विरोधी पक्ष पीडीपीने घेतली. तर फुटीर हुर्रियत गटांनीही सहभाग घेण्यास नकार दिला. अशा बिकट परिस्थितीत गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने समंजस भूमिका घेतली.. आणि आपण सगळ्यांशी बोलू, या भूमिकेचा पुनरुच्चार केला.. त्यानंतर विरोधी पक्ष पीडीपी शिष्टमंडळात सहभागी झाला खरा, पण त्यांच्या नेत्या महबूबा मुफ्ती मात्र दूर राहिल्या. दुसरीकडे, फुटीर गटांनी ताठर भूमिका घेतली असली तरी आपण सौम्य भूमिका घेत शिष्टमंडळातील व्यक्ती हुर्रियत नेते सय्यद अली शाह गीलानी यांना घरी भेटालया गेले. नवी दिल्ली सर्वांशी चर्चा करू इच्छिते, हा स्पष्ट संदेश यामुळे खोर्‍यात गेला. पण हुर्रियत कान्फरन्स आपल्या जुन्याच भूमिकेवर ठाम राहिली. शिष्टमंडळात सहभागी झालेल्या सत्तारूढ नॅशनल कॉन्फरन्स आणि विरोधी पीडीपीने. त्यांनी लष्कराचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली.शिवसेना सोडून देशातील प्रत्येक मोठ्या पक्षाने आपापले प्रतिनिधी या शिष्टमंडळात पाठवले आहेत. हे नेते उद्याही काश्मीर आणि जम्मूमधील नेत्यांना आणि लोकांना भेटतील. या शिष्टमंडळाचा अहवाल कॅबिनेटकडे सादर झाल्यानंतर काश्मीरविषयी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2010 02:09 PM IST

गिलानींची ताठर भूमिका कायम

20 सप्टेंबर

काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल झाले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर फुटीरवादी नेते मिरवाईज आणि गिलानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

त्यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. श्रीनगरला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका गटाने आज हुर्रियतनेते सय्यद अली शहा गिलानी यांची भेट घेऊन चर्चा केली.

राज्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन गिलानी यांना करण्यात आले. सिताराम येचुरी यांनी गिलानी यांच्याशी चर्चा केली.

मात्र भारत सरकार जोपर्यंत पाच कलमी प्रस्ताव मान्य करणार नाही, तोपर्यंत शांतता निर्माण होणार नाही असे सांगत गिलानी यांनी आपली ताठर भूमिका कायम ठेवली.

येचुरी जेकेएलएफचा नेते यासिन मलिकचीही भेट घेणार आहेत.

आज दिवसभरात काश्मीरमध्ये काय काय घडले त्याचा हा वृत्तांत...

केंद्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये दाखल झाले. या शिष्टमंडळातील सदस्यांनी दिवसभरात अनेक पक्षनेते आणि सर्वसामान्य लोकांच्या भेटी घेतल्या. फुटीरवादी नेत्यांनी या शिष्टमंडळात सहभागी व्हायला नकार दिला.

पण या शिष्टमंडळातल नेत्यांनी सामंजस्याची भूमिका दाखवली आणि या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या. काश्मीरमधील प्रत्येक गटाची भूमिका या नेत्यांना जाणून घ्यायची आहे, हा संदेश या निमित्ताने काश्मीरमध्ये पोहोचला.

बीबी जानच्या नातवाला दगडफेक केल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सोडवण्यासाठी पोलीस माझ्याकडे 20 हजार रुपये मागतात, अशी कैफियत तिने दिल्लीहून आलेल्या 37 सदस्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासमोर मांडली.

काश्मीरला पोचल्यावर या शिष्टमंडळाचे स्वागत थंड प्रतिसादाने झाले. कर्फ्यू हटवला जात नाही, तोवर चर्चेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका मुख्य विरोधी पक्ष पीडीपीने घेतली. तर फुटीर हुर्रियत गटांनीही सहभाग घेण्यास नकार दिला.

अशा बिकट परिस्थितीत गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने समंजस भूमिका घेतली.. आणि आपण सगळ्यांशी बोलू, या भूमिकेचा पुनरुच्चार केला..

त्यानंतर विरोधी पक्ष पीडीपी शिष्टमंडळात सहभागी झाला खरा, पण त्यांच्या नेत्या महबूबा मुफ्ती मात्र दूर राहिल्या. दुसरीकडे, फुटीर गटांनी ताठर भूमिका घेतली असली तरी आपण सौम्य भूमिका घेत शिष्टमंडळातील व्यक्ती हुर्रियत नेते सय्यद अली शाह गीलानी यांना घरी भेटालया गेले. नवी दिल्ली सर्वांशी चर्चा करू इच्छिते, हा स्पष्ट संदेश यामुळे खोर्‍यात गेला. पण हुर्रियत कान्फरन्स आपल्या जुन्याच भूमिकेवर ठाम राहिली.

शिष्टमंडळात सहभागी झालेल्या सत्तारूढ नॅशनल कॉन्फरन्स आणि विरोधी पीडीपीने. त्यांनी लष्कराचे अधिकार काढून घेण्याची मागणी केली.

शिवसेना सोडून देशातील प्रत्येक मोठ्या पक्षाने आपापले प्रतिनिधी या शिष्टमंडळात पाठवले आहेत. हे नेते उद्याही काश्मीर आणि जम्मूमधील नेत्यांना आणि लोकांना भेटतील. या शिष्टमंडळाचा अहवाल कॅबिनेटकडे सादर झाल्यानंतर काश्मीरविषयी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2010 02:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close