S M L

आता कॉमनवेल्थ व्हिलेजवर टीका

21 सप्टेंबरकॉमनवेल्थ गेम्स आता फक्त 12 दिवसांवर येऊन ठेपलेत, पण कॉमनवेल्थ गेम्स आणि वाद काही संपत नाहीत. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष माईक फेनेल यांनी आता कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजच्या बांधकामावर टीका केली आहे. त्याचबरोबर कॉमनवेल्थ गेम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक हुपर यांनीही कॉमनवेल्थ व्हिलेज घाणेरड्या परिस्थितीत असल्याचे म्हटले आहे. अधिकार्‍यांसाठी बांधण्यात आलेली घरे आणि टॉयलेट्सही खराब परिस्थितीत असल्याचे हुपर यांनी सांगितले. कॉमनवेल्थमध्ये सहभागी होणार्‍या ऍथलिट्ससाठी तसेच विविध देशांच्या पदाधिकार्‍यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी या व्हिलेजचे बांधकाम करण्यात आले होते. पण या बांधकामामध्ये अनेक तडजोडी करण्यात आल्यात, असे माईक फेनेल यांनी म्हटले आहे. गेम्स व्हिलेजमध्ये अनेक गैरसोयी असल्याची तक्रार इथे राहण्यास आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपल्याकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर न्यूझिलंड, कॅनडा, स्कॉटलंड आणि आयर्लंड या टीमनीही यावरून टीका केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 10:54 AM IST

आता कॉमनवेल्थ व्हिलेजवर टीका

21 सप्टेंबर

कॉमनवेल्थ गेम्स आता फक्त 12 दिवसांवर येऊन ठेपलेत, पण कॉमनवेल्थ गेम्स आणि वाद काही संपत नाहीत. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे अध्यक्ष माईक फेनेल यांनी आता कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजच्या बांधकामावर टीका केली आहे.

त्याचबरोबर कॉमनवेल्थ गेम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक हुपर यांनीही कॉमनवेल्थ व्हिलेज घाणेरड्या परिस्थितीत असल्याचे म्हटले आहे.

अधिकार्‍यांसाठी बांधण्यात आलेली घरे आणि टॉयलेट्सही खराब परिस्थितीत असल्याचे हुपर यांनी सांगितले. कॉमनवेल्थमध्ये सहभागी होणार्‍या ऍथलिट्ससाठी तसेच विविध देशांच्या पदाधिकार्‍यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी या व्हिलेजचे बांधकाम करण्यात आले होते.

पण या बांधकामामध्ये अनेक तडजोडी करण्यात आल्यात, असे माईक फेनेल यांनी म्हटले आहे. गेम्स व्हिलेजमध्ये अनेक गैरसोयी असल्याची तक्रार इथे राहण्यास आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींनी आपल्याकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर न्यूझिलंड, कॅनडा, स्कॉटलंड आणि आयर्लंड या टीमनीही यावरून टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close