S M L

टोल कंपन्यांच्या टॅक्सची माहिती गुलदस्त्यात

21 सप्टेंबरटोल वसुली करणार्‍या कंपन्या किती इन्कम टॅक्स भरतात, यासंदर्भात वाशिमचे हरिश्चंद्र पवार यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली आहे. मात्र राज्य सरकारने पवार यांना ही माहिती नाकारली आहे. त्यामुळे पवार यांनी नंतर पंतप्रधान कार्यालयाकडे यासंदर्भात देशाभरातील माहिती मागितली. पंतप्रधान कार्यालयाने अर्थमंत्रालय आणि नॅशनल हायवे अथॉरिटीला यासंदर्भात माहिती द्यायला सांगितले. हायवे ऍथॉरिटीने 2008- 09 या वर्षात राज्यात 3 हजार कोटी टोल वसूल झाल्याचे सांगितले. देशातील मुख्य 42 टोलनाक्यावर 10 हजार कोटींपेक्षा जास्त वसुली होते, ही माहितीही त्यातून पुढे आली. पण टोलवसुली करणार्‍या कंपन्या किती इन्कम टॅक्स भरतात, याची माहिती कोणत्याही विभागाने पवार यांना दिली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2010 01:51 PM IST

टोल कंपन्यांच्या टॅक्सची माहिती गुलदस्त्यात

21 सप्टेंबर

टोल वसुली करणार्‍या कंपन्या किती इन्कम टॅक्स भरतात, यासंदर्भात वाशिमचे हरिश्चंद्र पवार यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली आहे. मात्र राज्य सरकारने पवार यांना ही माहिती नाकारली आहे.

त्यामुळे पवार यांनी नंतर पंतप्रधान कार्यालयाकडे यासंदर्भात देशाभरातील माहिती मागितली. पंतप्रधान कार्यालयाने अर्थमंत्रालय आणि नॅशनल हायवे अथॉरिटीला यासंदर्भात माहिती द्यायला सांगितले.

हायवे ऍथॉरिटीने 2008- 09 या वर्षात राज्यात 3 हजार कोटी टोल वसूल झाल्याचे सांगितले. देशातील मुख्य 42 टोलनाक्यावर 10 हजार कोटींपेक्षा जास्त वसुली होते, ही माहितीही त्यातून पुढे आली.

पण टोलवसुली करणार्‍या कंपन्या किती इन्कम टॅक्स भरतात, याची माहिती कोणत्याही विभागाने पवार यांना दिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2010 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close