S M L

निवडणुकी पूर्वी आघाडीत बिघाडी

26 सप्टेंबरकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही आता आघाडी झाल्याचे नारायण राणेंनी सांगितले. काँग्रेसला 55, तर राष्ट्रवादीला 52 जागा देण्याचा निर्णय राणेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. नारायण राणे यांच्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी याबाबतची बैठक झाली. त्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, वसंत डावखरे, गणेश नाईक ह्या प्रमुख नेत्यांसह स्थानिक नेते हजर होते. दरम्यान, नारायण राणेंनी ही आघाडी झाल्याचे घोषित केले असले तरी, ही अधिकृत घोषणा नसून, ती आघाडीचा राष्ट्रवादीला दिलेला प्रस्ताव आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी या आघाडीवर प्रश्नचिन्ह उभा केला आहे. येत्या मंगळवारी संसदीय समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे पिचड यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितले. आता शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यांच्यात थेट सामना होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 12:59 PM IST

निवडणुकी पूर्वी आघाडीत बिघाडी

26 सप्टेंबर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही आता आघाडी झाल्याचे नारायण राणेंनी सांगितले.

काँग्रेसला 55, तर राष्ट्रवादीला 52 जागा देण्याचा निर्णय राणेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. नारायण राणे यांच्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी याबाबतची बैठक झाली.

त्या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, वसंत डावखरे, गणेश नाईक ह्या प्रमुख नेत्यांसह स्थानिक नेते हजर होते.

दरम्यान, नारायण राणेंनी ही आघाडी झाल्याचे घोषित केले असले तरी, ही अधिकृत घोषणा नसून, ती आघाडीचा राष्ट्रवादीला दिलेला प्रस्ताव आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी या आघाडीवर प्रश्नचिन्ह उभा केला आहे.

येत्या मंगळवारी संसदीय समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे पिचड यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितले.

आता शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी यांच्यात थेट सामना होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close