S M L

मुंबईत नेव्ही भरतीतला घोटाळा उघड

26 सप्टेंबरमुंबईत सीबीआयने नेव्ही भरतीतला घोटाळा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. नेव्हीतल्या 175 क्लार्कच्या जागांसाठी आज भरती परीक्षा आयोजित केली होती. त्यासाठी देशभरातून 35 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. पण या परीक्षेतील प्रश्नपत्रिका नौदलातल्या दोन अधिकार्‍यांनी आधीच फोडल्या होत्या. या दोन अधिकार्‍यांना आणि एक माजी नौदल अधिकार्‍याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे. या प्रश्नपत्रिका ते 15 ते 50 हजार रुपयांना विकत होते. या प्रश्नपत्रिका विकत असतानाच सीबीआयने रंगेहात त्यांना पकडले. या चौघांनी सुरू केलेल्या मानसा इंटरनॅशनल या एजन्सीमार्फत ते हा गैरव्यवहार करत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 26, 2010 02:08 PM IST

मुंबईत नेव्ही भरतीतला घोटाळा उघड

26 सप्टेंबर

मुंबईत सीबीआयने नेव्ही भरतीतला घोटाळा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. नेव्हीतल्या 175 क्लार्कच्या जागांसाठी आज भरती परीक्षा आयोजित केली होती.

त्यासाठी देशभरातून 35 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. पण या परीक्षेतील प्रश्नपत्रिका नौदलातल्या दोन अधिकार्‍यांनी आधीच फोडल्या होत्या.

या दोन अधिकार्‍यांना आणि एक माजी नौदल अधिकार्‍याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे.

या प्रश्नपत्रिका ते 15 ते 50 हजार रुपयांना विकत होते. या प्रश्नपत्रिका विकत असतानाच सीबीआयने रंगेहात त्यांना पकडले. या चौघांनी सुरू केलेल्या मानसा इंटरनॅशनल या एजन्सीमार्फत ते हा गैरव्यवहार करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2010 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close