S M L

हा तर भारतविरोधी कट...

आशिष दीक्षित, नवी दिल्ली 27 सप्टेंबरगेल्या कित्येक दिवसांपासून कॉमनवेल्थ खेळांच्या आयोजनावर टीका सहन करणार्‍या सुरेश कलमाडींनी आता प्रत्युत्तर दिले आहे. या खेळांवर टीका करणे हा भारताविरोधातील कट आहे, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी कॉमनवेल्थ व्हिलेजच्या अस्वच्छतेसाठी विकासकांना जबाबदार धरले आहे. 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या या खेळांची तयारी आता पूर्ण होत आली असून तिथे एक हजारांहून जास्त परदेशी खेळाडू दाखल झाले आहेत. पण तरीही आरोप प्रत्यारोप मात्र सुरू आहेत.आयबीएन नेटवर्कशी बोलताना कलमाडी म्हणाले, की कॉमनवेल्थ खेळांच्या आयोजनावर होत असलेली परदेशी पाहुण्यांची टीका ही भारतापोटी असलेल्या आकसामुळे होत आहे. खेलगावचे स्वच्छ भाग न दाखवता मुद्दामहून एखाद्या अस्वच्छ संडासाचे फोटो जगभर दाखवले गेले, हाही याच कटाचा भाग होता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. एकीकडे कलमाडींनी परदेशी पाहुण्यांचा समाचार घेतला. तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी कॉमनवेल्थ व्हिलेजच्या दुरवस्थेसाठी दिल्ली विकास प्राधिकरण आणि एमार एमजीएफ या विकासकाला जबाबदार धरले. या दोघांनी जर वेळेत काम केले असते, तर स्वच्छता वेळेत झाली असती, असे त्या म्हणाल्या. यमुनेच्या तीरावर वसवलेलं कॉमनवेल्थ व्हिलेज हे या खेळांचे एक मुख्य आकर्षण असणार होते. पण या व्हिलेजवरूनच सगळ्यात जास्त वाद झाला. अजूनही इथे काम सुरू आहे. 1168 पैकी 40 सदनिकांचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.पण एकीकडे हे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आतापर्यंत अकराशेहून जास्त परदेशी खेळाडू कॉमनवेल्थ व्हिलेजमध्ये दाखल झालेत. कॅनडा, स्कॉटलंड, इंग्लंड, केनिया, नायजेरिया, त्रिनिदाद, वेल्स, दक्षिण अफ्रिका, मलेशिया या देशांतील खेळाडूंसोबत भारतीय खेळाडूंनीही इथे राहायला आणि सरावाला सुरुवात केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2010 02:54 PM IST

हा तर भारतविरोधी कट...

आशिष दीक्षित, नवी दिल्ली

27 सप्टेंबर

गेल्या कित्येक दिवसांपासून कॉमनवेल्थ खेळांच्या आयोजनावर टीका सहन करणार्‍या सुरेश कलमाडींनी आता प्रत्युत्तर दिले आहे. या खेळांवर टीका करणे हा भारताविरोधातील कट आहे, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.

तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी कॉमनवेल्थ व्हिलेजच्या अस्वच्छतेसाठी विकासकांना जबाबदार धरले आहे. 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या या खेळांची तयारी आता पूर्ण होत आली असून तिथे एक हजारांहून जास्त परदेशी खेळाडू दाखल झाले आहेत. पण तरीही आरोप प्रत्यारोप मात्र सुरू आहेत.

आयबीएन नेटवर्कशी बोलताना कलमाडी म्हणाले, की कॉमनवेल्थ खेळांच्या आयोजनावर होत असलेली परदेशी पाहुण्यांची टीका ही भारतापोटी असलेल्या आकसामुळे होत आहे. खेलगावचे स्वच्छ भाग न दाखवता मुद्दामहून एखाद्या अस्वच्छ संडासाचे फोटो जगभर दाखवले गेले, हाही याच कटाचा भाग होता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

एकीकडे कलमाडींनी परदेशी पाहुण्यांचा समाचार घेतला. तर दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी कॉमनवेल्थ व्हिलेजच्या दुरवस्थेसाठी दिल्ली विकास प्राधिकरण आणि एमार एमजीएफ या विकासकाला जबाबदार धरले. या दोघांनी जर वेळेत काम केले असते, तर स्वच्छता वेळेत झाली असती, असे त्या म्हणाल्या.

यमुनेच्या तीरावर वसवलेलं कॉमनवेल्थ व्हिलेज हे या खेळांचे एक मुख्य आकर्षण असणार होते. पण या व्हिलेजवरूनच सगळ्यात जास्त वाद झाला. अजूनही इथे काम सुरू आहे. 1168 पैकी 40 सदनिकांचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

पण एकीकडे हे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आतापर्यंत अकराशेहून जास्त परदेशी खेळाडू कॉमनवेल्थ व्हिलेजमध्ये दाखल झालेत. कॅनडा, स्कॉटलंड, इंग्लंड, केनिया, नायजेरिया, त्रिनिदाद, वेल्स, दक्षिण अफ्रिका, मलेशिया या देशांतील खेळाडूंसोबत भारतीय खेळाडूंनीही इथे राहायला आणि सरावाला सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2010 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close