S M L

गृहमंत्र्यांना संगत गुन्हेगारांची

28 सप्टेंबरराजकीय नेते आणि गुन्हेगारांच्या संबंधांवर नेहमीच चर्चा होते. तर दुसरीकडे पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे अनेकवेळा उघडही झाले आहे. पण पोलीस खातेच ज्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येते तेच जर गुन्हेगारांसोबत दिसले तर...हो, असे घडले आहे...गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही जणांची भेट घेतल्याचे उघड झाले आहे.गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांबाबत गृहमंत्री एवढे अनभिज्ञ कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसिम सिद्दकी यांनी 11 सप्टेंबरला ईदच्या पार्टीचे आयोजन केले होते. सिद्दीकी यांनी भायखळ्याच्या इरफान पॅलेस या बिल्डिंगमध्ये 17 व्या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये ही पार्टी दिली होती. यावेळी आर. आर. पाटील यांची ज्यांच्याशी भेट झाली, त्यात दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असलेला सलीम पटेल याचा समावेश होता. तर दुसरी व्यक्ती होती मोबीन कुरेशी. भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा यांच्या खूनप्रकरणातील मोबीन हा एक आरोपी होता. तर एका हॉटेलवर दरोडा घातल्याचा गुन्हाही मोबीनवर दाखल आहे. तिसरी व्यक्ती होती इरफान कुरेशी. इरफान कुरेशी हा व्यवसायाने बिल्डर आहे. आणि बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी त्याला महापालिकेने नोटीशीही बजावल्या आहेत. एक नजर टाकूयात या गुन्हेगारांच्या कारकिर्दीवर - सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा - सलीम हा डॉन दाऊद इब्राहीम याची लहान बहिण हसिना पारकर हिचा ड्रायव्हर आहे. त्याचे डी कंपनीसोबतचे घनिष्ठ संबध सर्वश्रुत आहेत. हसिनाचा नवरा इब्राहीम पारकर याच्यावर 1992 मध्ये अरुण गवळीच्या गुंडानी हल्ला केला होता. यात इब्राहीमला वाचवताना सलिमला गोळी लागली होती. अवलानी बिल्डरने सलिम पटेल, हसिना पारकर आणि सलिम कुरेशी यांच्याविरोधात 1 कोटी रुपयाची खंडणी मागीतल्याप्रकरणी 2006 मध्ये बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातून सलीम जामिनावर जेलबाहेर आहे. हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी सलीमला मुंबई आणि हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. बोगस पासपोर्ट प्रकरणीही सलीम पटेल आणि हसिना पारकर यांच्याविरुध्द नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मोबीन कुरेशी - भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रेम कुमार शर्मा यांच्या खून प्रकरणात मोबीनचे नाव आले होते. मोबीनला पोलिसांनी अटक केली होती. सागर हॉटेलमध्ये दरोडा टाकल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी मोबीनविरुध्द गुन्हा दाखल आहे. नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे. याच कुरेशीला आबांनी अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नेमले आहे.इरफान कुरेशी - हा व्यवसायाने बिल्डर असून त्याच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने अनेक नोटीसा बजावल्या आहेत. त्याचे नाव अनेकदा ब्लॅकलिस्टमध्ये अनेकदा आले आहे. चौकशी करणारईद आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी काही ठिकाणी शुभेच्छा द्यायला गेलो होतो. तिथे जर आरोपी किंवा गुन्हेगार आले असतील तर मला माहिती नाही. या प्रकाराची मी चौकशी करेन, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2010 02:07 PM IST

28 सप्टेंबर

राजकीय नेते आणि गुन्हेगारांच्या संबंधांवर नेहमीच चर्चा होते. तर दुसरीकडे पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे अनेकवेळा उघडही झाले आहे. पण पोलीस खातेच ज्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येते तेच जर गुन्हेगारांसोबत दिसले तर...हो, असे घडले आहे...गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही जणांची भेट घेतल्याचे उघड झाले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांबाबत गृहमंत्री एवढे अनभिज्ञ कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसिम सिद्दकी यांनी 11 सप्टेंबरला ईदच्या पार्टीचे आयोजन केले होते. सिद्दीकी यांनी भायखळ्याच्या इरफान पॅलेस या बिल्डिंगमध्ये 17 व्या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये ही पार्टी दिली होती.

यावेळी आर. आर. पाटील यांची ज्यांच्याशी भेट झाली, त्यात दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असलेला सलीम पटेल याचा समावेश होता. तर दुसरी व्यक्ती होती मोबीन कुरेशी. भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा यांच्या खूनप्रकरणातील मोबीन हा एक आरोपी होता.

तर एका हॉटेलवर दरोडा घातल्याचा गुन्हाही मोबीनवर दाखल आहे. तिसरी व्यक्ती होती इरफान कुरेशी. इरफान कुरेशी हा व्यवसायाने बिल्डर आहे. आणि बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी त्याला महापालिकेने नोटीशीही बजावल्या आहेत.

एक नजर टाकूयात या गुन्हेगारांच्या कारकिर्दीवर -

सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा -

सलीम हा डॉन दाऊद इब्राहीम याची लहान बहिण हसिना पारकर हिचा ड्रायव्हर आहे. त्याचे डी कंपनीसोबतचे घनिष्ठ संबध सर्वश्रुत आहेत. हसिनाचा नवरा इब्राहीम पारकर याच्यावर 1992 मध्ये अरुण गवळीच्या गुंडानी हल्ला केला होता. यात इब्राहीमला वाचवताना सलिमला गोळी लागली होती.

अवलानी बिल्डरने सलिम पटेल, हसिना पारकर आणि सलिम कुरेशी यांच्याविरोधात 1 कोटी रुपयाची खंडणी मागीतल्याप्रकरणी 2006 मध्ये बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातून सलीम जामिनावर जेलबाहेर आहे. हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी सलीमला मुंबई आणि हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. बोगस पासपोर्ट प्रकरणीही सलीम पटेल आणि हसिना पारकर यांच्याविरुध्द नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मोबीन कुरेशी -

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रेम कुमार शर्मा यांच्या खून प्रकरणात मोबीनचे नाव आले होते. मोबीनला पोलिसांनी अटक केली होती. सागर हॉटेलमध्ये दरोडा टाकल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी मोबीनविरुध्द गुन्हा दाखल आहे. नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे. याच कुरेशीला आबांनी अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नेमले आहे.

इरफान कुरेशी -

हा व्यवसायाने बिल्डर असून त्याच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने अनेक नोटीसा बजावल्या आहेत. त्याचे नाव अनेकदा ब्लॅकलिस्टमध्ये अनेकदा आले आहे.

चौकशी करणार

ईद आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी काही ठिकाणी शुभेच्छा द्यायला गेलो होतो. तिथे जर आरोपी किंवा गुन्हेगार आले असतील तर मला माहिती नाही. या प्रकाराची मी चौकशी करेन, असे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2010 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close