S M L

हिमायत बेगला न्यायालयीन कोठडी

28 सप्टेंबरपुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेगला 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश आज कोर्टाने दिले. हिमायत बेगची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. बेगचे वकीलपत्र घेतल्याने त्याचे वकील अब्दुल रेहमान यांचा निषेध पुणे बार असोसिएशनने केला होता. आज मात्र गांधीगिरी करत वकिलांनी गुलाबाची फुले देत दिलजमाई केली. तसेच या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून पुण्याच्याच वकिलाची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी बार असोसिएशनतर्फे करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2010 03:01 PM IST

हिमायत बेगला न्यायालयीन कोठडी

28 सप्टेंबर

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेगला 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश आज कोर्टाने दिले.

हिमायत बेगची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. बेगचे वकीलपत्र घेतल्याने त्याचे वकील अब्दुल रेहमान यांचा निषेध पुणे बार असोसिएशनने केला होता.

आज मात्र गांधीगिरी करत वकिलांनी गुलाबाची फुले देत दिलजमाई केली. तसेच या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून पुण्याच्याच वकिलाची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी बार असोसिएशनतर्फे करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2010 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close