S M L

बॉलीवूडचे शांततेसाठी आवाहन

30 सप्टेंबरअयोध्येच्या निकालानंतर देशभरात सर्वत्र शांतता राहावी यासाठी बॉलीवूड स्टार्स एकत्र आले आहेत. ट्ीवटरवर या बॉलीवूड तार्‍यांनी देशभरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान, सोनम कपूर, रितेश देशमुख, रणबीर कपूर आदी कलावंतांनी ट्ीवटवरून शांततेसाठी या भावना व्यक्त केल्या आहेत.अमिताभ बच्चन - एकत्र रहा, एक रहा, आधी आपली देशातली एकजूट आणि मगच सर्वकाही सलमान खान - हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख आणि इतर धर्मातील माणसे हे सर्व सगळ्यात आधी एकमेकांचे बंधू-भगिनी आहेत. त्यामुळे एकमेकांशी भांडण्यापेक्षा आपण एकत्र राहणे आणि प्रेमभाव पसरवणे जास्त महत्वाचे आहे. रणबीर कपूर - अनजाना अनजानी सिनेमाच्या रिलीजला अयोध्या निकाल जाहीर होणार असल्याने आम्हाला हा दिवस सिनेमा रिलीजचे सेलिब्रेशन करण्यासाठी योग्य वाटला नाही. आम्ही या सिनेमाचे रिलीज पुढे म्हणजेच 1 ऑक्टोबरला करायचे ठरवले आहे. बाबरी मशीद पाडल्याची घटना आणि त्यानंतरची स्फोटक परिस्थिती अजूनही मला आठवते. त्यामुळे या निकालानंतर देशातील शांतता आमच्या सिनेमाच्या रिलीजपेक्षा जास्त महत्वाची आहे. रितेश देशमुख - एकसंघ भारत हाच धर्म मी मानतो. एकत्र रहा आणि दाखवा जगाला की भारत हा वंडरफुल देश आहे. अनुपम खेर - मी टॉरन्टोमध्ये असलो तरी माझे मन मात्र भारतातच आहे. जगाला कळू दे की भारतातील एकसंघतेला कोणताही न्यायालयीन निकाल धक्का लावू शकणार नाही, चला भारतीय म्हणूनच राहू या..सोनम कपूर - लक्षात ठेवा, united we stand and divided we fall. हे प्रेम आणि बंधुभावच आपल्या देशाची शक्ती आहे, त्यामुळे ही शक्ती कधीही कमी होऊ देऊ नका.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 30, 2010 10:38 AM IST

बॉलीवूडचे शांततेसाठी आवाहन

30 सप्टेंबर

अयोध्येच्या निकालानंतर देशभरात सर्वत्र शांतता राहावी यासाठी बॉलीवूड स्टार्स एकत्र आले आहेत. ट्ीवटरवर या बॉलीवूड तार्‍यांनी देशभरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

अमिताभ बच्चन, सलमान खान, सोनम कपूर, रितेश देशमुख, रणबीर कपूर आदी कलावंतांनी ट्ीवटवरून शांततेसाठी या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ बच्चन - एकत्र रहा, एक रहा, आधी आपली देशातली एकजूट आणि मगच सर्वकाही

सलमान खान - हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख आणि इतर धर्मातील माणसे हे सर्व सगळ्यात आधी एकमेकांचे बंधू-भगिनी आहेत. त्यामुळे एकमेकांशी भांडण्यापेक्षा आपण एकत्र राहणे आणि प्रेमभाव पसरवणे जास्त महत्वाचे आहे.

रणबीर कपूर - अनजाना अनजानी सिनेमाच्या रिलीजला अयोध्या निकाल जाहीर होणार असल्याने आम्हाला हा दिवस सिनेमा रिलीजचे सेलिब्रेशन करण्यासाठी योग्य वाटला नाही.

आम्ही या सिनेमाचे रिलीज पुढे म्हणजेच 1 ऑक्टोबरला करायचे ठरवले आहे. बाबरी मशीद पाडल्याची घटना आणि त्यानंतरची स्फोटक परिस्थिती अजूनही मला आठवते. त्यामुळे या निकालानंतर देशातील शांतता आमच्या सिनेमाच्या रिलीजपेक्षा जास्त महत्वाची आहे.

रितेश देशमुख - एकसंघ भारत हाच धर्म मी मानतो. एकत्र रहा आणि दाखवा जगाला की भारत हा वंडरफुल देश आहे.

अनुपम खेर - मी टॉरन्टोमध्ये असलो तरी माझे मन मात्र भारतातच आहे. जगाला कळू दे की भारतातील एकसंघतेला कोणताही न्यायालयीन निकाल धक्का लावू शकणार नाही, चला भारतीय म्हणूनच राहू या..

सोनम कपूर - लक्षात ठेवा, united we stand and divided we fall. हे प्रेम आणि बंधुभावच आपल्या देशाची शक्ती आहे, त्यामुळे ही शक्ती कधीही कमी होऊ देऊ नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2010 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close