S M L

वादग्रस्त जमिनीचे तीन भाग

30 सप्टेंबरअयोध्येतील वादग्रस्त जमिनीविषयीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन तीन भागात विभागली गेली आहे. जमिनीचा मूळ भाग रामजन्मभूमीसाठी, सीता रसोई आणि रामचबुतर्‍याचा भाग निर्मोही आखाड्याला आणि उर्वरीत भाग सुन्नी वक्फ बोर्डाच्या नावे करण्यात यावा, असे कोर्टाने म्हटले आहे. सुन्नी वक्फ बोर्ड आणि आणि निर्मोही आखाड्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या दोघांनीही संपूर्ण जागेवर दावा केला होता. रामलल्लाची मूर्ती ज्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, ती जागा हिंदूंची असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. बाबरी कृती समिती याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे. 60 बाय 40 चौरस फूट जागेचा हा वाद होता. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने हा निकाल दिला आहे. http://www.rjbm.nic.in/ या वेबसाईटवर हा निकाल सविस्तरपणे पाहता येईल... निकालाच्या ठळक मुद्द्यांवर एक नजर टाकूया...मशिदीच्या मुख्य घुमटाखालची जागा रामाची जन्मभूमी आहे, ही हिंदूंची श्रद्धा कोर्टाला मान्य वादग्रस्त जागेची तीन भागात विभागणी करावी1/3 भाग वक्फ बोर्डाला, 1/3 भाग हिंदूंना, आणि 1/3 भाग निर्मोही आखाड्याला सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाड्याचा संपूर्ण जागेवरचा दावा फेटाळला तीन महिने जागेवर जैसे थे परिस्थिती राहणार अयोध्या प्रकरणाचा हा निकाल नेमका काय आहे, ते पाहूया... अयोध्येतील वादग्रस्त जागेचे तीन भाग केले जातील1/3 जागा राम लल्लाला, 1/3 जागा सुन्नी वक्फ बोर्डाला, 1/3 जागा निर्मोही आखाड्यालासंपूर्ण जागेचा ताबा मिळावा, ही सुन्नी बोर्डाची आणि निर्मोही अखाड्याची मागणी फेटाळलीजिथे मूर्ती विराजमान आहेत, ती रामाची जन्मभूमी, ही जागा हिंदूंना मिळणारत्याभोवतीची जागा सुन्नी वक्फ बोर्डाला आणि निर्मोही आखाड्याला मिळणार60 वर्षं चाललेल्या आणि सार्‍या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्येतील ऐतिहासिक केसचा निकाल अखेरीस लागला. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात दुपारी चारच्या सुमारास या निकालाच्या वाचनाला सुरवात झाली. अत्यंत गुंतागुंतीच्या या केसमध्ये खंडपीठावर असलेल्या न्यायमूर्ती खान, न्यायमूर्ती अग्रवाल आणि न्यायमूर्ती शर्मा यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद झाले. पण 2 विरुद्ध 1 या बहुमताच्या न्यायाने अंतर्गत मदभेदांवर तोडगा काढण्यात आला.सहा दशके चाललेल्या या केसचे मूळ प्रतिवादी असलेल्या हाशीम अन्सारी यांनी या निकालाचे स्वागत केले. पण सुन्नी वक्फ बोर्ड मात्र नाराज आहे. ते आता सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. वादग्रस्त जागेची तीन तुकड्यात विभागणी करण्याचे कोर्टाने आदेश दिले असले, तरी पुढचे तीन महिने जैसे थे परिस्थिती ठेवण्यात येणार आहे. तोपर्यंत सुन्नी वक्फ बोर्ड सुप्रीमा कोर्टात दाद मागू शकते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 30, 2010 11:38 AM IST

वादग्रस्त जमिनीचे तीन भाग

30 सप्टेंबर

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीविषयीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन तीन भागात विभागली गेली आहे.

जमिनीचा मूळ भाग रामजन्मभूमीसाठी, सीता रसोई आणि रामचबुतर्‍याचा भाग निर्मोही आखाड्याला आणि उर्वरीत भाग सुन्नी वक्फ बोर्डाच्या नावे करण्यात यावा, असे कोर्टाने म्हटले आहे.

सुन्नी वक्फ बोर्ड आणि आणि निर्मोही आखाड्याची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या दोघांनीही संपूर्ण जागेवर दावा केला होता. रामलल्लाची मूर्ती ज्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, ती जागा हिंदूंची असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

बाबरी कृती समिती याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे. 60 बाय 40 चौरस फूट जागेचा हा वाद होता. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

http://www.rjbm.nic.in/ या वेबसाईटवर हा निकाल सविस्तरपणे पाहता येईल...

निकालाच्या ठळक मुद्द्यांवर एक नजर टाकूया...

मशिदीच्या मुख्य घुमटाखालची जागा रामाची जन्मभूमी आहे, ही हिंदूंची श्रद्धा कोर्टाला मान्य

वादग्रस्त जागेची तीन भागात विभागणी करावी

1/3 भाग वक्फ बोर्डाला, 1/3 भाग हिंदूंना, आणि 1/3 भाग निर्मोही आखाड्याला

सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही आखाड्याचा संपूर्ण जागेवरचा दावा फेटाळला

तीन महिने जागेवर जैसे थे परिस्थिती राहणार

अयोध्या प्रकरणाचा हा निकाल नेमका काय आहे, ते पाहूया...

अयोध्येतील वादग्रस्त जागेचे तीन भाग केले जातील

1/3 जागा राम लल्लाला, 1/3 जागा सुन्नी वक्फ बोर्डाला, 1/3 जागा निर्मोही आखाड्याला

संपूर्ण जागेचा ताबा मिळावा, ही सुन्नी बोर्डाची आणि निर्मोही अखाड्याची मागणी फेटाळली

जिथे मूर्ती विराजमान आहेत, ती रामाची जन्मभूमी, ही जागा हिंदूंना मिळणार

त्याभोवतीची जागा सुन्नी वक्फ बोर्डाला आणि निर्मोही आखाड्याला मिळणार

60 वर्षं चाललेल्या आणि सार्‍या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्येतील ऐतिहासिक केसचा निकाल अखेरीस लागला. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात दुपारी चारच्या सुमारास या निकालाच्या वाचनाला सुरवात झाली. अत्यंत गुंतागुंतीच्या या केसमध्ये खंडपीठावर असलेल्या न्यायमूर्ती खान, न्यायमूर्ती अग्रवाल आणि न्यायमूर्ती शर्मा यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद झाले. पण 2 विरुद्ध 1 या बहुमताच्या न्यायाने अंतर्गत मदभेदांवर तोडगा काढण्यात आला.

सहा दशके चाललेल्या या केसचे मूळ प्रतिवादी असलेल्या हाशीम अन्सारी यांनी या निकालाचे स्वागत केले. पण सुन्नी वक्फ बोर्ड मात्र नाराज आहे. ते आता सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.

वादग्रस्त जागेची तीन तुकड्यात विभागणी करण्याचे कोर्टाने आदेश दिले असले, तरी पुढचे तीन महिने जैसे थे परिस्थिती ठेवण्यात येणार आहे. तोपर्यंत सुन्नी वक्फ बोर्ड सुप्रीमा कोर्टात दाद मागू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2010 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close